Holika Dahan Things to Offer and Avoid: दरवर्षी होळीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. पण त्याआधी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होलिका दहन करण्याची प्रथा आहे. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो.
होलिका दहनाच्या दिवशी घराच्या अंगणात किंवा मोकळ्या जागेत होळी पेटवली जाते. पूजा-अर्चा करून काही नियम पाळले जातात. होळीच्या अग्नीत काय टाकावे, ज्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल, याबद्दल अनेकजण बोलतात. पण होलिका दहनाच्या अग्नीत कोणत्या गोष्टी टाकू नयेत, हे मात्र कमी लोकांना माहिती असते. चला तर मग जाणून घेऊया, होळीच्या अग्नीत टाकणे निषिद्ध असलेल्या वस्तूंची यादी.
होलिका दहनाच्या दिवशी ही चूक करू नका (Holi)
यंदा २ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी होळी पौर्णिमा साजरी केली जाईल आणि ३ मार्चला धुलिवंदन साजरे केले जाईल. होलिका दहनाच्या दिवशी पूजा करून होळीच्या अग्नीत काही पवित्र वस्तू टाकण्याची प्रथा आहे. पण याचबरोबर हे लक्षात ठेवणेही महत्त्वाचे आहे की काही वस्तू अशा आहेत, ज्या चुकूनही होळीच्या अग्नीत टाकू नयेत. असे केल्यास घरात नकारात्मकता येऊ शकते, आई लक्ष्मी रुसू शकते किंवा मोठे नुकसानही होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया, होळीच्या अग्नीत कोणत्या वस्तू टाकू नयेत.
होलिका दहनाच्या अग्नीत काय टाकू नये? (Holika Dahan Things to Avoid)
- पाणी असलेला नारळ
- सुकलेली फुले
- तुटलेले तांदूळ
- सुकलेली फळे
- तुळशीची पाने
- सुकलेल्या गव्हाच्या कणसे
- पिंपळ, वड, आंबा आणि शमी यांसारख्या पवित्र झाडांची लाकडे
- चामड्याच्या वस्तू
- प्लास्टिकच्या वस्तू
- तुटलेल्या वस्तू
- खराब झालेलं सामान
- जुनी झाडू
- घाणेरडे कपडे
- काचेच्या वस्तू
- चोरीचे सामान
होलिका दहनाच्या अग्नीत काय टाकावे? (Holika Dahan Things to Put)
सर्वप्रथम देवाचे स्मरण करा आणि होळीच्या अग्नीला नमस्कार करा. त्यानंतर एक-एक करून पूजेची सामग्री अग्नीत अर्पण करा.
अग्नीत टाकण्यासाठी शुभ मानल्या जाणाऱ्या वस्तू पुढीलप्रमाणे आहेत- तूप, फुले, गोवऱ्या, सुकलेला नारळ, लवंग, गव्हाची कणसे, नवीन पिकाच्या कणस्या, हरभऱ्याच्या शेंगा, गुलाल, बताशे, काळे तीळ, पिवळी मोहरी, कापूर, हंगामी फळे, हळकुंड, काही थेंब गंगाजल, रोळी (कुंकू), कच्चा सूत, जव आणि अक्षता (तांदूळ).
अशा प्रकारची इतर पूजेची सामग्रीही होलिका दहनाच्या अग्नीत अर्पण करणे शुभ मानले जाते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
