scorecardresearch

Premium

Horoscope : राशीभविष्य, मंगळवार ३ जानेवारी २०२३

Daily Rashi Bhavishya In Marathi : राशिभविष्यानुसार वृषभ राशीच्या व्यक्तीनी वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. कोणत्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका.

Astro new
राशीभविष्य २५ जानेवारी, (Dainik Rashi Bhavishya)

Today Rashi Bhavishya, 03 January 2023 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

अतिउत्साह दाखवू नका. सहजासहजी समोरच्यावर विश्वास ठेऊ नका. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. खाण्यापिण्याची आवड पूर्ण होईल. नातेवाईकांशी नाते अधिक दृढ होईल.

Daily HHoroscope 9 october 2023
Daily Horoscope: ‘या’ राशीच्या व्यक्तींना होणार आर्थिक लाभ, पाहा तुमचे भविष्य
Daily Horoscope 6 october 2023
Daily Horoscope: कोणत्या राशीच्या लोकांनी फसवणूकीपासून सावध राहावे? पाहा तुमचे भविष्य
Daily Horoscope 26 September 2023
Daily Horoscope: मकरला जोडीदाराची साथ मिळणार तर ‘या’ राशीच्या व्यक्तींनी आर्थिक व्यवहार करताना सावध राहावे
Daily Horoscope 24 September 2023
Daily Horoscope: ‘या’ राशीच्या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रणे ठेवावे; जाणून घ्या १२ राशींचे भविष्य

वृषभ:-

वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. कोणत्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका. नवीन योजनेवर काम करण्यावर भर द्या. घरातील वातावरण आनंदी राहील. मित्रांचे सहकार्य लाभेल.

मिथुन:-

आपल्या आक्रमकतेला आळा घाला. योग्य नियोजनावर भर द्या. वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. जोडीदाराचे प्रगल्भ विचार दिसून येतील. शिस्तीचे धोरण ठेवा.

कर्क:-

लोकांच्या चर्चेचा विषय बनाल. मित्रांकडून उधारी वसूल होईल. हातातील काम मन लावून करा. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा कराल. एकाच गोष्टीवर अडून राहू नका.

सिंह:-

कामानिमित्त लहान प्रवास घडतील. दिनक्रम व्यस्त राहील. कार्यालयीन कामे सुरळीत पार पडतील. सूर्योपासना उपयुक्त ठरेल. घरगुती वातावरण शांत राहील.

कन्या:-

जोडीदाराशी सामंजस्य ठेवा. वादाचे प्रसंग टाळावेत. आत्मविश्वासाने कार्यरत रहा. प्रयत्नात कसूर करू नका. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल.

तूळ:-

दिवस दगदगीत जाईल. नवीन कामात तडजोड करू नका. अचानक धनलाभ संभवतो. हाताखालील लोकांवर विसंबून राहू नका. संयमित व्यवहार करू नका.

वृश्चिक:-

शांत डोक्याने काम करावे. वरिष्ठांच्या मर्जीनेच काम करा. लाभाची संधी सोडू नका. केवळ कामावर लक्ष केंद्रित करावे. नवीन गोष्टी आत्मसात कराव्यात.

धनू:-

विद्यार्थ्यानी संधी सोडू नये. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. एक छोटासा बदल लाभदायक ठरेल. नवीन संधी उपलब्ध होतील. कुटुंबातील व्यक्तींशी वैचारिक मतभेद होऊ शकतात.

मकर:-

कामाच्या बाबतीत संभ्रमित राहू नका. प्रत्येक गोष्टीत स्पष्टता बाळगावी. निर्णय घेताना हवे तर वेळ मागून घ्या. जुगारातून लाभ संभवतो. एकावेळी अनेक गोष्टी हाताळू नका.

कुंभ:-

काही अनुत्तरित प्रश्न मार्गी लागतील. लोक तुमच्या मताचा विचार करतील. मोसमी आजरांकडे दुर्लक्ष करू नका. आहारवर नियंत्रण ठेवावे. व्यापारी वर्गाला दिवस चांगला जाईल.

मीन:-

व्यावसायिक गोष्टी नीट लक्षात घेऊन मगच मत नोंदवा. बोलताना सारासार विचार करावा. जोखीम पत्करावी लागेल. बुद्धीचा सुयोग्य वापर करावा. अडचणीत असलेल्यांना मदत कराल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Horoscope 03 january 2023 daily astrology rashi bhavishya in marathi msr

First published on: 02-01-2023 at 20:26 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×