Today Rashi Bhavishya, 04 December 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

भविष्याची फार चिंता करू नका. जवळच्या नातेवाईकाचा सल्ला मोलाचा ठरेल. काही प्रश्न लवकरच निकालात निघतील. तुमच्या समस्यांचे निराकरण होईल. मानसिक दृष्ट्‍या सक्षम बनाल.

Ram Navmi 2024 Ram Raksha Stotra Reading Benefits in Marathi
Ram Navami 2024 : जाणून घ्या ‘रामरक्षा’ अन् भगवान शंकराचा ‘हा’ संबंध; पाहा, दररोज रामरक्षा स्तोत्र म्हटल्याचे फायदे
Chaitra Navratri Maha Ashtami Rare Yog Siddhi & Ravi To Make These 5 Rashi Extremely Rich
आज महाअष्‍टमीपासून वर्षभर ‘या’ ५ राशींच्या घरी नांदणार लक्ष्मी; सिद्धी व रवी योग तुमच्या राशीला काय देणार?
11th April 2024 Panchang Guruvaar Marathi Rashi Bhavishya
११ एप्रिल, गुरुवार पंचांग: आज आयुष्यमान, सौभाग्य योग; तुमच्या राशीच्या कुंडलीत आज कोणत्या रूपात लाभेल गौरी कृपा?
10th April 2024 Panchang Mesh To Meen Rashi Bhavishya Today
१० एप्रिल पंचांग: तूळ, कर्कसहित ‘या’ राशी आज धनाढ्य होऊन इतरांनाही करतील मदत; आजचे १२ राशींचे भविष्य वाचा

वृषभ:-

भावंडांसोबत वेळ मजेत घालवाल. मनात उगाच नसत्या चिंता आणू नका. वेळेचा सदुपयोग करावा. देवाणघेवाण करताना सावध राहावे. लहान भावाला दूर गावी जावे लागेल.

मिथुन:-

आज सुखद अनुभव येतील. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. कौतुकाने अधिक चांगली प्रेरणा मिळेल. भावंडांसोबत नवीन काम सुरू करू शकता. चर्चा सकारात्मक असेल.

कर्क:-

वायफळ बडबड करणार्‍यांपासून दूर राहावे. आपल्या कामावर लक्ष केन्द्रित करावे. घरातील कामासाठी थोडा वेळ काढावा लागेल. दिवस धावपळीत जाईल. एखादी नवीन जबाबदारी अंगावर पडू शकते.

सिंह:-

आरोग्यात सकारात्मक बदल दिसून येतील. कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल. प्रवासात वेळेचे भान राखावे. परोपकाराची जाणीव ठेवाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.

कन्या:-

आज दिवस संमिश्र जाईल. अनपेक्षित लाभ मिळू शकतात. मात्र फार हुरळून जाऊ नका. द्विधा मनस्थितीतून बाहेर यावे. अति विचार करणे टाळावे.

तूळ:-

शत्रूलाही आज मित्र बनवू शकाल. इतरांवर तुमची चांगली छाप पडेल. कामाच्या ठिकाणी आज चांगले परिणाम पहायला मिळतील. पत्नीला खुश करता येईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

वृश्चिक:-

आज  मनाची संवेदनशीलता दाखवाल. शब्दांचे वजन लक्षात घ्यावे. लहान सहान गोष्टींना फार महत्त्व देऊ नका. विद्यार्थ्यांना दिवस चांगला जाईल. अभ्यासातून मन विचलीत होऊ देऊ नका.

धनू:-

आजचा दिवस प्रसन्नतेत जाईल. मनातील इच्छा पूर्ण करता येईल. लॉटरी लागू शकते. प्रेमी युगुलांना दिवस सुखद जाईल. आवडत्या गोष्टी करायला वेळ मिळेल.

मकर:-

आपली क्षमता ओळखून काम करावे. आळस झटकावा लागेल. अति स्पष्ट बोलणे टाळावे. जुन्या गोष्टी आठवत बसू नका. कामाचा उरक वाढवावा.

कुंभ:-

जवळचा प्रवास चांगला होईल. तुमच्या हातातील काम पूर्ण होईल. अधिक धीटपणे काम कराल. पराक्रमाला चांगला वाव आहे. नातेसंबंधात सुधारणा होईल.

मीन:-

आपले मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी ध्यान करावे. व्यायामाला कंटाळा करू नका. आवडते पदार्थ खाल. घरातील ज्येष्ठ मंडळींशी चर्चा करावी. कौटुंबिक सौख्यात भर पडेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर