Today Rashi Bhavishya, 11 March 2023 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

जवळचा प्रवास करावा लागेल. कामाची काहीशी धांदल राहील. वैचारिक स्थिरता जपावी. आवडी-निवडी वर अधिक भर द्याल. मनाची चंचलता थांबवावी.

nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
With the skin or without and cooked Apples relief against gastrointestinal such as diarrhoea and constipation issues
सफरचंदाच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अतिसाराची समस्या झटक्यात होईल दूर; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ टिप्स करा फॉलो
Shani Nakshatra Gochar On 6th April 2024
३ दिवसांनी शनीचे नक्षत्र गोचर होताच ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; रिकामी तिजोरी धन-धान्याने भरण्याचे संकेत
MPSC interview
‘एमपीएससी’च्या मुलाखतीत गुण वाढवून देण्यासाठी ‘निनावी’ फोन, पडद्यामागे कोण…

वृषभ:-

वाणीत मधुरता ठेवाल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. नवीन फॅशनचे कपडे खरेदी कराल. आनंदी दृष्टीकोन ठेवून वागाल.

मिथुन:-

मनाची चलबिचलता रोखावी लागेल. अतिविचार करणे टाळावे. काही गोष्टी उघडपणे बोलणे टाळाल. हातातील कामाचे योग्य नियोजन करावे. फार पसारा वाढवून घेऊ नका.

कर्क:-

चांगला व्यावसायिक लाभ होईल. नवीन मित्र जोडले जातील. तुमच्यातील शालीनता दिसून येईल. जिथे जाल तिथे आनंद वाटाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.

सिंह:-

कामाचा दर्जा सुधारेल. घराची उत्कृष्ट सजावट कराल. दिवस प्रसन्नतेत जाईल. आपल्या बोलण्याने इतरांची मने जिंकून घ्याल. सौंदर्य प्रसाधने खरेदी कराल.

कन्या:-

मनाची विशालता दाखवाल. इतरांना सढळ हाताने मदत कराल. सर्वांसमोर तुमची कला सादर करता येईल. गायन, वादन कलेला पोषक वातावरण लाभेल. धार्मिक कामात हातभार लावाल.

तूळ:-

शेअर्सच्या व्यवसायातून लाभ संभवतो. व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून वागाल. कमी श्रमात कामे पार पडतील. योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी. प्रलोभनापासून दूर राहावे.

वृश्चिक:-

शांतपणे विचार करावा लागेल. पत्नीचा लाडिक हट्ट पुरवाल. एकमेकांच्या सहवासाचा आनंद घ्याल. महिलांना गृहिणीपदाचा मान मिळेल. कर्तव्यदक्षता चांगल्या पद्धतीने पाळाल.

धनू:-

उगाचच खट्टू होऊ नये. आपले गुण सिद्ध करण्यासाठी वेळ द्यावा. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत.

मकर:-

नाटक-सिनेमा पाहण्याचा बेत आखाल. दिवस मौजमजेत घालवाल. कलात्मक दृष्टीने वागणे ठेवाल. काहीसा व्यावहारिक दृष्टीकोन ठेवाल. रागावर नियंत्रण ठेवावे.

कुंभ:-

समाधानी वृत्ती ठेवून राहाल. घराची स्वच्छता काढाल. बागबगीच्यात रमून जाल. उत्तम गृहसौख्य लाभेल. घरात सर्वांशी प्रेमाने वागाल.

मीन:-

निसर्गाच्या सानिध्यात रममाण व्हाल. वाचनाची आवड पूर्ण करता येईल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. नवीन गोष्टी शिकून घ्याल. नातलगांशी सलोखा वाढेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर