Today Rashi Bhavishya, 14 March 2023 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

घरातच मन रमेल. घर टापटीप ठेवाल. जुनी पुस्तके काढून वाचत बसाल. चटपटीत पदार्थ खाल. दिवस मजेत घालवाल.

Budh Gochar 2024 Aries budh transit in mesh these three zodiac sign will be success all sector
एक महिन्याने बुधाचे मेष राशीत गोचर; ‘या’ तीन राशीच्या लोकांचे चमकेल नशीब? अचानक धनलाभाची शक्यता
11th April 2024 Panchang Guruvaar Marathi Rashi Bhavishya
११ एप्रिल, गुरुवार पंचांग: आज आयुष्यमान, सौभाग्य योग; तुमच्या राशीच्या कुंडलीत आज कोणत्या रूपात लाभेल गौरी कृपा?
1st April Marathi Rashi Bhavishya
१ एप्रिल पंचांग: महिन्याचा पहिला दिवस मेष ते मीन राशीला कसा जाईल? ‘या’ राशींच्या लोकांसाठी धन व प्रगतीचे संकेत
Good Friday: 29th March Panchang & Rashi Bhavishya
२९ मार्च पंचांग: कर्क, मीनसह ‘या’ राशींच्या लोकांचं आज चारचौघात होईल कौतुक; शुक्रवारी कुणाला लाभेल वैभव

वृषभ:-

मित्रांशी गप्पा माराल. जवळचा प्रवास कराल. नवीन गोष्टींची माहिती जमवाल. भावंडांशी सलोखा वाढेल. प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल.

मिथुन:-

पत्नीचा सहवास हवाहवासा वाटेल. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. फार थंड पदार्थ खाऊ नयेत. काही कामे उगाचच अडकून पडतील. स्वप्नात रमून जाल.

कर्क:-

उगाचच घाई-घाई करू नका. आपल्या मर्जीने वागाल. बाहेरील गोष्टींचा फार विचार करू नका. चंचलतेवर मात करावी. मनातील आकांक्षा पूर्ण होईल.

सिंह:-

विचारात वाहून जाऊ नका. मानसिक स्थैर्य जपावे. हातातील कला सर्वांसमोर सादर करता येईल. तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल. भागीदारीत नफा मिळेल.

कन्या:-

इतरांचा विश्वास संपादन करावा. हातातील कामात यश येईल. घरगुती प्रश्न सोडवावेत. नातेवाईकांची मदत मिळेल. आत्मविश्वास सोडून चालणार नाही.

तूळ:-

गैरसमजाला मनात जागा देऊ नका. मुलांशी खेळण्यात वेळ घालवाल. नातेवाईकांची नाराजी दूर करावी. गृहशांती जपावी लागेल. मुलांची मते जाणून घ्यावीत.

वृश्चिक:-

धाडस करतांना सतर्क राहावे. शा‍ब्दिक चकमक टाळावी. हातापायांना किरकोळ इजा संभवते. कामातून समाधान शोधावे. जोडीदाराचे सौख्य वाढीस लागेल.

धनू:-

फसवणुकीपासून सावध राहावे. बाहेर फिरताना मौल्यवान गोष्टी सांभाळाव्यात. अनाठायी खर्च होऊ शकतो. अपयशाने खचून जाऊ नका. धार्मिक गोष्टीत मन रमवा.

मकर:-

अडथळ्यातून मार्ग काढावा. प्रकृतीची काळजी घ्यावी. आततायीपणे निर्णय घेऊ नका. इतरांच्या मनाचा विचार करावा. नातेवाईकांशी सलोखा ठेवावा लागेल.

कुंभ:-

अधिकारी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. चित्त एकाग्रतेसाठी ध्यानधारणा करावी. गरज नसतांना खर्च करू नका. आपली संगत तपासून पहावी. जबाबदारीची जाणीव ठेवावी.

मीन:-

काही कामे वेळ घालवतील. उगाचच खिळून पडल्यासारखे वाटू शकते. मनातील भीती बाजूला सारावी. स्वत: साठी वेळ बाजूला काढावा. उष्णतेचा त्रास जाणवेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर