17th February Horoscope Marathi: वैदिक ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशींचे वर्णन केले आहे. प्रत्येक राशीवर एका ग्रहाचे राज्य असते. ग्रह आणि ताऱ्यांच्या हालचालींच्या आधारे प्रत्येक राशीचे मूल्यांकन केले जाते. १७ फेब्रुवारी २०२४ शनिवार आहे. या दिवशी चंद्र शुक्र, वृषभ राशीत भ्रमण करेल. तसेच आज माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी असून या दिवशी रवियोग, सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि कृतिका नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योगाचा लाभ मिळणार आहे. या राशीचे लोकांच्या कामातील सर्व अडथळे दूर होऊ शकतात.पण तुमच्या राशीत काय लिहिले आहे आणि त्याने तुमच्या आयुष्यात काय बदल होतील जाणून घ्या.

मेष:-मानसिक चंचलता जाणवेल. घरापासून दूर जावे लागेल. पत्नीशी किरकोळ कारणावरून मतभेद संभवतात. जुनी येणी वसूल होतील. हातातील अधिकार वापरावे.

वृषभ:-जोडीदाराचे वर्चस्व राहील. एकमेकांची बाजू समजून घ्यावी. काही गोष्टी मनाविरूद्ध वाटू शकतात. कोर्ट कचेरीची कामे तूर्तास टाळावीत. मनातील इच्छा पूर्ण होईल. 

मिथुन:-कामात चंचलता दाखवू नका. एकसूत्रतेने कामे करावीत. पोटाची काळजी घ्यावी. मुलांचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते. कौटुंबिक जबाबदारी लक्षात घ्या.

कर्क:-सहृदयतेने मदत कराल. परोपकाराची जाणीव ठेवा. भावनिक गुंतागुंत जाणवेल. काही लाभ अचानक होतील. जोडीदाराचे मत विचारात घ्यावे.

सिंह:-वैवाहिक सौख्य बहरून येईल. दूरच्या गावी जाण्याचे  योग येईल. आरोग्यात काहीशी सुधारणा होईल. शेअर्स मधून काही फायदा संभवतो. अचानक धन लाभाची शक्यता.

कन्या:-हाताखालील नोकरांचे सहकारी लाभेल. कौटुंबिक गरजा भागवटा येतील. प्रवासात सावधगिरी बाळगावी. मनातील अकारण भीती बाजूस सारा. भागीदारीत फायदा होईल.

तूळ:-प्रवासात काळजी घ्यावी. भावंडांची मदत मिळेल. अनाठायी खर्च वधू शकतो. हातातील कामात चिकाटी ठेवा. प्रकृतीची काळजी घ्यावी. 

वृश्चिक:-फार हट्टीपणा करू नका. अति उत्साह दाखवू नका. पित्त विकार बळावू शकतो. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. पराक्रमाला वाव मिळेल.

धनू:-जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. हाता पायांची दुखणी त्रासदायक ठरू शकतात. कौटुंबिक खर्च वाढेल. आवक-जावक ह्यांचे योग्य गणित मांडा. गैर-समजुतीं पासून दूर रहा.

मकर:-मित्र-मंडळींशी मतभेद संभवतात. सामाजिक कार्यात मदत कराल. अति अपेक्षा बाळगू नका. कौटुंबिक अडचणींतून मार्ग काढता येईल. अध्यात्मिक प्रगती होईल.

कुंभ:-नसत्या प्रकरणात अडकू नका. काही बदलांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. कामाचा ताण जाणवेल. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल. थोरांशी मतभेद संभवतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीन:-आवडत्या कामात अधिक लक्ष्य द्यावे. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. औद्योगिक वाढ करणे शक्य होईल. अधिकार्‍यांची भेट होईल.