Today Rashi Bhavishya, 17 March 2023 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

कौटुंबिक सौख्य चांगले राहील. बोलण्यातून इतरांवर छाप पडाल. गायन कलेला चांगला दर्जा मिळेल. व्यवहारी दृष्टिकोन ठेवाल. गुंतवणुकीचा नवीन पर्याय शोधावा.

Budh Margi 2024
९ दिवसांनी ‘या’ राशींचे लोक होतील भाग्याचे धनी? हनुमान जयंतीनंतर बुधदेव मार्गी होताच उघडू शकतात उत्पन्नाचे नवे स्त्रोत
curiosity about indians performance in paris olympic
अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?
Good Friday: 29th March Panchang & Rashi Bhavishya
२९ मार्च पंचांग: कर्क, मीनसह ‘या’ राशींच्या लोकांचं आज चारचौघात होईल कौतुक; शुक्रवारी कुणाला लाभेल वैभव
Why the people born in the April month are so different from others Know their nature and personality
एप्रिल महिन्यात जन्मलेली माणसं का असतात इतरांपेक्षा वेगळे? जाणून घ्या त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व

वृषभ:-

वैवाहिक सौख्यात भर पडेल. जीवनाकडे आनंदी दृष्टिकोनातून पाहाल. तुमच्या व्यक्तिमत्वात आकर्षकता येईल. करमणुकीचे कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवाल. नटण्या मुरडण्याची हौस भागवाल.

मिथुन:-

जवळचा प्रवास करावा लागेल. भावंडांची उत्तम साथ लाभेल. सहकुटुंब दिवस मजेत घालवाल. सरकारी कामात वेळ जाईल. वाचनाची आवड पूर्ण कराल.

कर्क:-

स्त्रियांशी मैत्री वाढेल. नवीन गोष्टींचे आकर्षण वाढेल. घरात तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. मनातील रुक्षपणा काढून टाकावा.

सिंह:-

इतरांवर तुमची छाप पडेल. चंचलतेवर मात करावी. व्यापारी वर्गाला फायदा संभवतो. जोडीदाराची व्यवहारकुशलता दिसून येईल. दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवाल.

कन्या:-

आवडते ग्रंथ गोळा कराल. धार्मिक कामात सहकार्य कराल. आधिभौतिक गोष्टींकडे कल राहील. शैक्षणिक कामे पूर्ण होतील. काही नवीन अनुभव गाठीशी बांधाल.

तूळ:-

रेस सट्टा यांतून धनलाभ संभवतो. नातेवाईकांची मदत घेता येईल. कामे वेगात पूर्ण करता येतील. जोडीदाराला प्रगतीचा वाव आहे. फसवणुकीपासून सावध राहा.

वृश्चिक:-

गैरसमजुतीतून मानसिक त्रास वाढू शकतो. गरज असेल तरच प्रवास करा. व्यवसाय वृद्धीचा विचार करा. भावंडांचे प्रश्न समोर येतील. हातून एखादे सत्कार्य घडेल.

धनू:-

मनाची संवेदना दाखवाल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. आध्यात्मिक प्रगती करता येईल. कौटुंबिक समस्या जाणून घ्याव्यात. जुन्या कामातून फायदा संभवतो.

मकर:-

काही गोष्टी अनपेक्षित घडू शकतात. कौटुंबिक जबाबदारी वाढू शकते. आर्थिक व्यवहारात सतर्कता दाखवावी. उधार उसनवारीचे व्यवहार टाळावेत. उगाचच चीड-चीड करू नये.

कुंभ:-

मनातील निराशा बाजूस सारावी. कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. अती भावनाशील होऊ नका. ध्यानधारणेत वेळ घालवाल. डोळ्यांची काळजी घ्यावी.

मीन:-

कामात उगाचच अडकून पडल्यासारखे वाटेल. लबाड लोकांपासून दूर राहा. अती काळजी करू नका. सार्वजनिक कामात मदत कराल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर