scorecardresearch

Premium

Horoscope : राशीभविष्य, शनिवार १८ मार्च २०२३

Daily Rashi Bhavishya In Marathi : राशिभविष्यानुसार तूळ राशीच्या व्यक्तींनी मानसिक गोंधळ दूर सारावा.

Today Horoscope
राशीभविष्य २ एप्रिल (Dainik Rashi Bhavishya)

Today Rashi Bhavishya, 18 March 2023 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

लोकसत्ताची ही बातमी वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in

मेष:-

एकाच कामात अधिक लक्ष द्यावे. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. मनाची द्विधावस्था वाढू शकते. संयम बाळगावा लागेल. आवडत्या गोष्टीत मन रमवा.

वृषभ:-

मितभाषी दृष्टीकोनातून वागाल. मनापेक्षा बुद्धीचा अधिक वापर कराल. फार संभ्रमात अडकू नका. सर्वांना आनंद वाटण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या स्वभावाची उत्तम छाप पडेल.

मिथुन:-

घरगुती कामात मन रमवाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. योग्य संधीची वाट पहावी लागेल. घरात नीटनेटकेपणा ठेवाल. कामे उगाचच खोळंबून राहतील.

कर्क:-

मौजमजेकडे अधिक कल राहील. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. स्त्री सौख्यात वाढ होईल. जवळच्या मित्रांचा सहवास लाभेल. जोडीदाराविषयी मनात गैरसमज निर्माण होऊ शकतो.

सिंह:-

नोकरीच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढू शकतो. वरिष्ठांना नाराज करून चालणार नाही. प्रवासात योग्य खबरदारी घ्यावी. पैशाचा अपव्यय टाळावा. जोडीदाराचा सल्ला विचारात घ्यावा.

कन्या:-

एकाच वेळी अनेक कामे अंगावर येऊ शकतात. कामातील तांत्रिक बाजू जाणून घ्यावी. मुलांचा खोडकरपणा वाढेल. उगाचच निरूत्साही वाटेल. आळस झटकून टाकावा.

तूळ:-

मानसिक गोंधळ दूर सारावा. फार काळजी करत बसू नका. लेखक वर्गाला चांगला लाभ मिळेल. बौद्धिक डावपेच खेळाल. सूचक स्वप्न पडू शकेल.

वृश्चिक:-

संभाषणाची आवड जोपासाल. घरी नातेवाईक गोळा होतील. तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल. नवीन मित्र जोडले जातील. प्रवासात खर्च वाढू शकतो.

धनू:-

कौटुंबिक गोष्टींचे भान राखावे. लेखक, प्रकाशक यांना चांगला लाभ होईल. लहान प्रवासाचा योग येईल. सर्व बाबी औत्सुक्याने जाणून घ्याल. काही गोष्टींचे मनन करावे.

मकर:-

प्रकृतीची काळजी घ्यावी. अनाठायी खर्च करू नका. कौटुंबिक परिस्थिती संयमाने हाताळावी. क्षुल्लक गोष्टी मनावर घेऊ नयेत. हातातील कामात अधिक लक्ष घालावे.

कुंभ:-

चौकसपणे गोष्टी समजून घ्याल. स्मरणशक्तीचा चांगला उपयोग कराल. भावना उत्तम प्रकारे मांडाल. घरगुती जबाबदारी वाढेल. कामाचे योग्य नियोजन करावे.

मीन:-

काहीसा थकवा जाणवेल. रहस्यमय गोष्टी जाणून घ्याल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. तुमची महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. मुलांकडे बारीक लक्ष ठेवावे लागेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-03-2023 at 19:02 IST