scorecardresearch

Premium

Horoscope : राशीभविष्य, रविवार १९ मार्च २०२३

Daily Rashi Bhavishya In Marathi : राशिभविष्यानुसार वृश्चिक राशीच्या व्यक्तींना भागीदारीतून उत्तम लाभ मिळेल.

Today Horoscope
राशीभविष्य २ एप्रिल (Dainik Rashi Bhavishya)

Today Rashi Bhavishya, 19 March 2023 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

लोकसत्ताची ही बातमी वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in

मेष:-

दिवस दगदगीत जाईल. थोडा वेगळा विचार करून पहावा. औद्योगिक स्थिरता सांभाळावी. कामात काही बदल करून पहावा लागेल. आवडी-निवडी बाबत दक्ष राहाल.

वृषभ:-

अधिकारी वर्गाची भेट घ्यावी लागेल. रेस, जुगार यांची आवड पूर्ण कराल. दिवस खेळकरपणात घालवाल. मनाजोगी खरेदी करता येईल. सर्वांना आपलेसे कराल.

मिथुन:-

कौटुंबिक कामात गढून जाल. पत्नीची उत्तम साथ मिळेल. उत्तम निद्रासौख्य मिळेल. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. जवळचे मित्र भेटतील.

कर्क:-

चारचौघात कौतुक केले जाईल. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. तुमची अरसिकता दूर सारावी. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

सिंह:-

कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. आवडीच्या गोष्टी करायला वेळ मिळेल. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. नवीन वाहन खरेदीचा विचार कराल.

कन्या:-

इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. तुमची उत्तम छाप पडेल. वेळेचे योग्य नियोजन करावे. मुलांच्या मताचा विचार करावा. जोडीदाराच्या आग्रहाला बळी पडाल.

तूळ:-

मनाची चंचलता वाढेल. कौटुंबिक गोष्टी चिघळू देवू नका. पित्त विकार बळावू शकतात. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. आरोग्यात सुधारणा होईल.

वृश्चिक:-

हातातील अधिकार वापरावेत. जोडीदाराचे कौतुक कराल. मैत्रीची घनिष्टता वाढेल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. भागीदारीतून उत्तम लाभ मिळेल.

धनू:-

बोलताना सारासार विचार करावा. वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा. जवळच्या मित्रांचा गोतावळा जमवाल. हाताखालील लोकांकडून कामे करून घ्याल. डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी.

मकर:-

सामाजिक कामात मदत कराल. परोपकाराची जाणीव ठेवावी. इतरांना सहृदयतेने मदत कराल. उष्णतेचे विकार वाढू शकतात. खाण्या पिण्याच्या वेळा पाळा.

कुंभ:-

सामुदायिक गोष्टीत फार लक्ष घालू नका. धार्मिक स्थळांना भेट द्यावी. बोलण्याच्या भरात जबाबदारी घेऊ नका. बागकामात मन रमेल. अचानक धनलाभ संभवतो.

मीन:-

बौद्धिक कौशल्य दाखवाल. हस्तकलेचे कौतुक केले जाईल. मित्रांशी मतभेद संभवतात. जोडीदाराचा उत्तम सहवास लाभेल. मनमोकळ्या गप्पा माराल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-03-2023 at 19:02 IST