scorecardresearch

Premium

Horoscope : राशीभविष्य, रविवार २ एप्रिल २०२३

Daily Rashi Bhavishya In Marathi : राशिभविष्यानुसार कुंभ राशीच्या व्यक्तींनी हातातील कला जोपासावी.

Today Horoscope
राशीभविष्य १४ मे २०२३ (Dainik Rashi Bhavishya)

Today Rashi Bhavishya, 2 April 2023 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

सेवावृत्तीने कामे हाती घ्याल. फक्त स्वत:चा विचार करू नये. कौटुंबिक प्रेम वाढीस लागेल. कष्टाला मागे-पुढे पाहू नका. मौल्यवान वस्तु जपून ठेवाव्यात.

वृषभ:-

तुमची धार्मिकता वाढीस लागेल. आत्मविश्वासाने कामे हाती घ्याल. सर्वांशी आनंदाने वागाल. हसत-खेळत कामे कराल. चांगला व्यावसायिक लाभ मिळेल.

मिथुन:-

घाई घाईने कामे उरकाल. एकाचवेळी अनेक कामात हात घालू नका. व्यावसायिक लाभाकडे विशेष लक्ष ठेवावे. चोरांपासून सावध राहावे. क्षणिक आनंद उपभोगाल.

कर्क:-

तुमची समाजप्रियता वाढीस लागेल. कामात मित्रांची मदत होईल. नवीन ओळखी वाढतील. उत्तम वाहन सौख्य लाभेल. हातातील कामात यश येईल.

सिंह:-

वडीलांची उत्तम साथ मिळेल. पारंपरिक कामात प्रगती कराल. व्यावसायिक स्थैर्य जपावे. अडथळ्यातून मार्ग काढता येईल. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे.

कन्या:-

हातून एखादे सत्कार्य घडेल. धार्मिक कामात सहभाग घ्याल. योग्य मार्गदर्शनाचा लाभ होईल. एखादी नवीन संधि चालून येईल. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल.

तूळ:-

अचानक धनलाभ संभवतो. वारसाहक्काच्या कामातून लाभ संभवतो. सट्टा, लॉटरी यांसारख्या मार्गाने लाभ संभवतो. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. वैचारिक शांतता जपावी.

वृश्चिक:-

वैवाहिक सौख्याला बहर येईल. सहकुटुंब प्रवासाचा आनंद घ्याल. मुलांशी खेळण्यात वेळ घालवाल. जवळचे मित्र गोळा कराल. आवडते साहित्य वाचायला मिळेल.

धनू:-

घरी जवळचे नातेवाईक गोळा होतील. जवळच्या लोकांशी हितगुज कराल. मानसिक शांतता शोधाल. पत्नीची बाजू समजून घ्यावी. हाताखालील लोकांकडून कामे करून घ्याल.

मकर:-

फार अट्टाहास करू नका. जुन्या गोष्टींनी खिन्न होणे टाळावे. जवळच्या प्रवासाचा आनंद घ्यावा. सरकारी कामात प्रगती होईल. जोडीदाराचे कौतुक कराल.

कुंभ:-

बोलण्यातून इतरांच्या मनाचा ठाव घ्याल. घरात नीटनेटकेपणा ठेवाल. स्त्रीवर्गापासून सावध राहावे. चौकसपणे कामाच्या बाबी जाणून घ्याव्यात. नवीन मित्र जोडावेत.

मीन:-

आवडते पुस्तक वाचाल. सखोल विचारांती निर्णय घ्याल. तुमची वैचारिक उत्क्रांती होईल. भावंडांचे सौख्य लाभेल. निसर्गाच्या सानिध्यात रमून जाल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 19:02 IST

संबंधित बातम्या