scorecardresearch

Premium

Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार २ जून २०२३

Daily Rashi Bhavishya In Marathi : राशिभविष्यानुसार कुंभ राशीच्या व्यक्तींना अपचनाचा त्रास वाढू शकतो.

Today Horoscope
राशीभविष्य २ जून २०२३ (Dainik Rashi Bhavishya)

Today Rashi Bhavishya, 2 June 2023 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

थोडेसे मनाविरुद्ध वागावे लागू शकते. मानापमानाच्या प्रसंगातून जावे लागू शकते. कामात मोठे बदल करण्याचा विचार करू नये. जवळच्या मित्रांशी दुरावा वाढू शकतो. कौटुंबिक खर्च वाढू शकतो.

manoj jarnage patil
“बाकीचं नंतर बघू, आधी माझ्या किडन्या तपासा”, मनोज जरांगेंच्या किडनीचा नेमका घोळ काय?
Actor Vijay Antony reacts on Daughter Meera suicide
“मी तिच्याबरोबर मेलो,” १६ वर्षीय मुलीच्या आत्महत्येनंतर अभिनेत्याची भावुक पोस्ट; म्हणाला, “जिथे जात, धर्म, पैसा…”
chandrashekhar bawankule
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…
ramdas kadam on uddhav thackeray aaditya
“आदित्यसाहेब आणि त्यांचा बाप…”, रामदास कदमांची टीका; म्हणाले, “…आता दोघंही पळतायत!”

वृषभ:-

कामात काही अनपेक्षित बदल घडून येतील. घरातील गोष्टींमध्ये विशेष लक्ष घाला. मनाविरुद्ध प्रवास करावा लागू शकतो. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. कामातील अडचणी दूर कराव्या लागतील.

मिथुन:-

नियोजनबद्ध कामे करावीत. कष्टाला मागेपुढे पाहू नका. वडीलधार्‍या व्यक्ती तुमच्यावर नाराज होऊ शकतात. प्रवासात मनस्ताप वाढू शकतो. नियमांचे काटेकोरपणे पालन कराल.

कर्क:-

किरकोळ दुखापत संभवते. जोडीदाराचा स्वभाव अचंबित करेल. थोरांचे वेळेवर मार्गदर्शन घ्यावे. आपल्या इच्छेला अधिक महत्त्व द्याल. घराबाहेर वावरतांना सतर्क राहावे.

सिंह:-

प्रिय व्यक्तीशी दुरावा वाढू शकतो. भागीदाराशी समजुतीने घ्यावे. अपचनाचा त्रास संभवतो. डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी. गृहसौख्याकडे विशेष लक्ष द्यावे.

कन्या:-

हाताखालील लोकांकडे बारीक लक्ष द्यावे. कामाचा ताण अधिक जाणवेल. वरिष्ठांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा. व्यावसायिक वृद्धीचा लाभ उठवावा. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.

तूळ:-

प्रेमप्रकरणाला वेगळी कलाटणी लागू शकते. रेस जुगारातून नुकसान संभवते. चोरांपासून सावध राहावे. मानसिक ताण काहीसा वाढू शकतो. मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे.

वृश्चिक:-

जवळच्या मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. कौटुंबिक अडचणीवर मात करता येईल. उष्णतेचा विकार बळावू शकतो. पित्त प्रकृती असणार्‍यांनी विशेष काळजी घ्यावी. नातेवाईक तुमच्यावर नाराज होऊ शकतात.

धनू:-

जवळचा प्रवास टाळलेलाच बरा. भावंडांशी मतभेदाचे प्रसंग उद्भवतील. नसते साहस महागात पडू शकते. कौटुंबिक खर्चाला आळा घालावा लागेल. भागीदारीच्या व्यवसायात नवीन ओळखी होतील.

मकर:-

स्वत:त काही जाणीवपूर्वक बदल करावे लागतील. अचानक काही खर्च सामोरे येतील. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. बोलताना शब्दांचे भान ठेवावे. मत्सराला बळी पडू नका.

कुंभ:-

उगाच कोणाशीही शत्रुत्व पत्करू नका. अपचनाचा त्रास वाढू शकतो. कापणे, भाजणे यांसारखे किरकोळ त्रास संभवतात. परिस्थितीला नावे ठेवू नका. शांतता व संयम बाळगावा.

मीन:-

मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा करावी. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल. धैर्याने नवीन कामाला सामोरे जा. जोडीदाराच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळा.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-06-2023 at 19:02 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×