Premium

Horoscope : राशीभविष्य, मंगळवार २१ मार्च २०२३

Daily Rashi Bhavishya In Marathi : राशिभविष्यानुसार मकर राशीच्या व्यक्तींनी प्रवासाची जोखीम शक्यतो घेऊ नये.

Today Horoscope
राशीभविष्य १४ मे २०२३ (Dainik Rashi Bhavishya)

Today Rashi Bhavishya, 21 March 2023 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

लोकसत्ताची ही बातमी वाचण्यासाठी साइन-इन करा

मेष:-

वाहन जपून चालवावे. डोके शांत ठेवून काम करावे. गरज पडल्यास चार पाऊले मागे यावे. लबाड लोकांपासून दूर राहावे. जोडीदाराचा आधार सुखावणारा असेल.

वृषभ:-

व्यापारात चांगली प्रगती करता येईल. राहत्या घराचे प्रश्न मार्गी लागतील. सत्संगासारख्या गोष्टीत मन रमेल. पित्ताचा त्रास वाढू शकतो. शक्यतो संघर्षाचे वातावरण टाळावे.

मिथुन:-

जवळच्या मित्रांच्या गाठी पडतील. आरोग्याकडे वेळीच लक्ष द्यावे. औद्योगिक चढउतार जाणवतील. पैसे गुंतवताना काळजी घ्यावी. कामाच्या ठिकाणी आपली पत सांभाळावी.

कर्क:-

भागीदारावर फार अवलंबून राहू नका. जोडीदाराच्या कलाने घ्यावे लागेल. लहान-सहान गोष्टीचा विपर्यास करू नका. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. चित्त स्थिर ठेवावे लागेल.

सिंह:-

व्यावसायिक वातावरणाचा अंदाज घ्यावा. छुप्या शत्रूंचा त्रास जाणवेल. मोठी उडी घेताना विचार करावा. आवक-जावक याचा योग्य अंदाज घ्यावा. वरिष्ठ तुमच्यावर नाराज होऊ शकतात.

कन्या:-

शेजार्‍यांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत. स्वत:कडे दुर्लक्ष करू नये. मुलांना स्वच्छतेचे वळण लावावे. अति धाडस करू नये. प्रवासात क्षुल्लक अडचण येऊ शकते.

तूळ:-

दिवस आनंदात जाईल. मन व बुद्धी यांचा समतोल राखावा. स्थावरचे काही प्रश्न उदभवू शकतात. घरगुती गैरसमज दूर करावेत. मुलांशी मतभेद होतील.

वृश्चिक:-

हातापायाला किरकोळ इजा संभवते. कामातील क्षुल्लक चुका टाळाव्यात. धोरणीपणाने वागावे लागेल. उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत. सकारात्मक विचार करावेत.

धनू:-

कौटुंबिक कामाची दगदग वाढेल. संभाषणाची आवड पूर्ण कराल. काही कामे खिळून पडतील. छोट्या कारणांवरून गैरसमज करून घ्याल. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

मकर:-

कामाचा व्याप वाढता राहील. व्यावसायिक उलाढाल वाढेल. प्रवासाची जोखीम शक्यतो घेऊ नये. चिकाटी सोडू नका. स्थावरची कामे मार्गी लागतील.

कुंभ:-

नातेवाईकांचा त्रास संभवतो. घरात शोभेच्या वस्तू आणाल. गायन कलेचे कौतुक केले जाईल. आध्यात्मिक बळ वाढेल. वारसाहक्काची कामे मार्गी लागतील.

मीन:-

स्वत:च्या मतावर आग्रही राहाल. स्वभावातील हेकेखोरपणा वाढू शकतो. प्रवासाचा आनंद घ्याल. मनावरील दडपण बाजूला सारावे. तुमच्या बोलण्याला धार येईल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 19:02 IST
Next Story
१९२३ नंतर पहिल्यांदा जुळले चार महाराजयोग; ‘या’ 5 राशींचे नशीब पालटणार? बँक बॅलन्समुळे बदलू शकते आयुष्य
Exit mobile version