Today Rashi Bhavishya, 21 February 2023 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

नटण्याची हौस पूर्ण कराल. तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी ठरेल. आनंदी दृष्टीकोन ठेवाल. प्रेमाच्या दृष्टीने नवीन मैत्री लाभेल. सर्वांशी मधुर वाणीने बोलाल.

11th April 2024 Panchang Guruvaar Marathi Rashi Bhavishya
११ एप्रिल, गुरुवार पंचांग: आज आयुष्यमान, सौभाग्य योग; तुमच्या राशीच्या कुंडलीत आज कोणत्या रूपात लाभेल गौरी कृपा?
Shani Nakshatra Gochar On 6th April 2024
३ दिवसांनी शनीचे नक्षत्र गोचर होताच ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; रिकामी तिजोरी धन-धान्याने भरण्याचे संकेत
Good Friday: 29th March Panchang & Rashi Bhavishya
२९ मार्च पंचांग: कर्क, मीनसह ‘या’ राशींच्या लोकांचं आज चारचौघात होईल कौतुक; शुक्रवारी कुणाला लाभेल वैभव
28 March Panchang Sankashti Chaturthi Mesh To Meen
आज संकष्टी चतुर्थीला मेष ते मीनपैकी कुणाच्या कुंडलीत मोदक पेढ्यांचा गोडवा? बाप्पा वर देणार की दंड, वाचा

वृषभ:-

प्रवासात आरोग्याची काळजी घ्यावी. कामात चंचलता आड येऊ शकते. भावंडांची बाजू जाणून घ्यावी. प्रकृतीची किरकोळ तक्रार जाणवेल. टीकेकडे दुर्लक्ष करावे.

मिथुन:-

रेसमध्ये चांगला लाभ होईल. मुलांच्या वेगळ्या खर्चाचे नियोजन करावे. घेतलेल्या ज्ञानाचा योग्य उपयोग होईल. काहीसे छांदीष्टपणे वागाल. करमणुकीसाठी अधिक वेळ घालवाल.

कर्क:-

उत्तम वाहन सौख्य लाभेल. घरातील ज्येष्ठांची मदत होईल. मनाचा सज्जनपणा दाखवाल. हसत खेळत सर्व गोष्टी पार पडाल. सजावटीच्या वस्तु खरेदी कराल.

सिंह:-

दूरच्या प्रवासाचा योग येईल. मनातील निराशा बाजूस सारावी. चंचलतेत वाढ होऊ शकते. जवळचे मित्र भेटतील. भावंडांच्या समस्या समजून घ्याल.

कन्या:-

जुन्या कामातून लाभ होईल. पैशाचा सदुपयोग कराल. खाण्या पिण्याबाबत चोखंदळ राहाल. मौल्यवान वस्तूंची आवड दर्शवाल.  व्यावसायिक लाभ उत्तम होईल.

तूळ:-

आपले कर्तव्य योग्य रीतीने बजावाल. आपले मत इतरांना मान्य करायला लावाल. प्रशासकीय भूमिका घ्याल. कामाचा उरक वाढेल. चिकाटीने कामे कराल.

वृश्चिक:-

आध्यात्मिक उन्नती साधण्याचा प्रयत्न कराल. ऐहिक गोष्टींची कामना करू नये. मनात नसतानाही प्रवास करावा लागेल. ढोंगी लोकांविषयी तिटकारा दाखवाल. ठाम निर्णयावर भर द्यावा.

धनू:-

अचानक धनलाभ संभवतो. मित्रांशी मतभेद संभवतात. योग्य संधीसाठी वाट पहावी लागेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. भडकपणे मत मांडू नका.

मकर:-

जोडीदाराची कर्तबगारी दिसून येईल. शांत संयमी विचार कराल. कामात पत्नीचा हातभार लाभेल. जबाबदारीने कामे उरकाल. चार-चौघांत कौतुक केले जाईल.

कुंभ:-

अधिकारी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. कामातील दिरंगाई टाळावी. श्रद्धेची बाजू लक्षात घ्यावी. वडीलांच्या मताचा आदर करावा. इतरांना आनंदाने मदत कराल.

मीन:-

मुलांचा उडणारा गोंधळ दूर करावा. सतत काळजी करत बसू नये. रेस जुगारातून लाभ संभवतो. भावनेच्या भरात वाहवून जाऊ नये. आवडीचे पदार्थ खायला मिळतील.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर