Premium

Horoscope : राशीभविष्य, बुधवार २२ मार्च २०२३

Daily Rashi Bhavishya In Marathi : राशिभविष्यानुसार कुंभ राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे मार्गी लागतील.

Today Horoscope
राशीभविष्य १४ मे २०२३ (Dainik Rashi Bhavishya)

Today Rashi Bhavishya, 22 March 2023 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

लोकसत्ताची ही बातमी वाचण्यासाठी साइन-इन करा

मेष:-

खाण्यापिण्याची चंगळ राहील. धार्मिक कामांकडे कल राहील. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवावीत. लेखणी जपून चालवावी. सामाजिक मान वाढेल.

वृषभ:-

वादावादीचे प्रसंग टाळावेत. आर्थिक आवक चांगली राहील. उधळपट्टीला आवार घालावा. पोटाच्या किरकोळ समस्या जाणवतील. मानसिक व्यग्रता दूर सारावी.

मिथुन:-

श्रद्धा व सबुरी बाळगावी लागेल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. भागीदारीत मिळतेजुळते घ्यावे लागेल. तब्येतीची हेळसांड करू नका. उपासनेतून मानसिक शांतता मिळेल.

कर्क:-

कोणत्याही गोष्टीचा विपर्यास करू नका. कागदपत्र नीट तपासून घ्यावीत. कौटुंबिक अडचणीतून मार्ग काढता येईल. वरिष्ठांशी जुळवून घ्या. आपली प्रतिष्ठा सांभाळावी लागेल.

सिंह:-

भाऊबंदकीचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी दक्षता बाळगावी. प्रकृतीची योग्य वेळी तपासणी करावी. प्रेमिकांनी अती वाहवत जाऊ नये. वरिष्ठांच्या कलाने घ्यावे लागेल.

कन्या:-

भागीदारीच्या व्यवसायात सबुरी बाळगा. सहकुटुंब प्रवासाचा योग येईल. छुप्या शत्रूंचा त्रास वाढू शकतो. तुमच्यातील उत्साह मावळू देऊ नका. बुद्धिकौशल्याने कामे करावीत.

तूळ:-

स्थावर संबंधीचे प्रश्न सोडवावेत. मुलांशी मतभेदाचे प्रसंग येतील. संघर्षाचे मुद्दे दूर सारावेत. सावधपणे व विचारपूर्वक कृती करा. कर्तव्यात व्यवहार आड आणू नका.

वृश्चिक:-

वैवाहिक सुखात सुधारणा होईल. क्षुल्लक कुरबुरी दूर साराव्यात. विरोधक डोके वर काढू शकतात. आळस झटकून कामाला लागावे लागेल. दुचाकी वाहन जपून चालवावे.

धनू:-

घरातील वातावरण खेळीमेळीचे ठेवण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराला कामात मदत करावी. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. धार्मिक कामात मन रमवावे. कौटुंबिक खर्च वाढू शकतो.

मकर:-

मनातील इच्छा पूर्ण होईल. सरकारी कामाचा लाभ उठवावा. कागदपत्रांवर सह्या करताना काळजी घ्यावी. भावंडांची नाराजी दूर करावी. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल.

कुंभ:-

घराचे नूतनीकरण काढाल. अर्थार्जनात वाढ संभवते. कामाच्या ठिकाणी मान वाढेल. जोडीदाराच्या कमाईत वाढ होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील.

मीन:-

कामाचे योग्य नियोजन करावे. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. भावंडांना आर्थिक मदत कराल. मैत्रीत वितुष्टता आणू नका. सामाजिक कामात सहभाग घ्याल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 19:02 IST
Next Story
३१ मार्चला बुध- शुक्र- राहू येणार एकत्र; ‘या’ राशींना श्रीमंतीची संधी, ‘या’ रूपात कमावू शकता बक्कळ पैसे
Exit mobile version