Today Rashi Bhavishya, 23 December 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

धार्मिक वा आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन कराल. नवीन ज्ञान गोळा करण्याकडे कल राहील. अनेक प्रश्नांची उकल काढता येईल. स्वत:साठी वेळ काढावा. तज्ञ लोकांशी संपर्क साधावा.

Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर पालटणार नशीब, ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा
11th April 2024 Panchang Guruvaar Marathi Rashi Bhavishya
११ एप्रिल, गुरुवार पंचांग: आज आयुष्यमान, सौभाग्य योग; तुमच्या राशीच्या कुंडलीत आज कोणत्या रूपात लाभेल गौरी कृपा?
venus planet transit in mee shukra transit in pisces these zodiac sign will be success all sector
शुक्र २४ एप्रिलपर्यंत मीन राशीत राहील विराजमान, ‘या’ तीन राशी होणार मालामाल?
1st April Marathi Rashi Bhavishya
१ एप्रिल पंचांग: महिन्याचा पहिला दिवस मेष ते मीन राशीला कसा जाईल? ‘या’ राशींच्या लोकांसाठी धन व प्रगतीचे संकेत

वृषभ:-

आरोग्याची काळजी घ्यावी. बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे. स्त्रीवर्गाशी जरा जपून वागावे. सहकार्‍यांशी सामंजस्याने वागावे. उगाचच हुरळून जाऊ नका.

मिथुन:-

आजचा दिवस ताजातवाना असेल.  नवविवाहिताना सरप्राइज मिळेल. व्यवसायिकांना चांगला फायदा मिळेल. वरिष्ठांकडून दाद मिळेल. चारचौघात कौतुक केले जाईल.

कर्क:-

विरोधकांपासून सावध राहावे. छुपे शत्रू त्रास देऊ शकतात. वाहन चालवताना काळजी घ्यावी. योग साधना करावी. मनाच्या चंचलतेला आवर घालावी.

सिंह:-

व्यापार्‍यांसाठी आजचा दिवस फलदायी असेल. नवीन संधी चालून येईल. विद्यार्थ्यांना नवीन आव्हान स्वीकारता येईल. तुमची एकाग्रता वाढेल. जोडीदाराला खुश ठेवता येईल.

कन्या:-

जमिनीशी संबंधित व्यवहार पार पडेल. कौटुंबिक जीवनात शुभ परिणाम पहायला मिळतील. घरातील लोकांसोबत चांगला वेळ घालवाल. साफसफाईची कामे काढाल. मन प्रसन्न राहील.

तूळ:-

पराक्रमात वाढ होईल. तुमची ऊर्जा पाहून लोक अचंबित होतील. सहकारी वर्ग तुमच्यावर प्रभावित होईल. कामासंबंधी प्रवास करावा लागेल. ओळखीचे लोक भेटतील.

वृश्चिक:-

देणी फेडता येतील. तसेच नवीन गुंतवणूक करता येईल. गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी. बोलण्यात गोडवा ठेवाल. आवडीच्या गोष्टी कराल.

धनू:-

बुद्धीच्या जोरावर नवीन कामे कराल. दिवस मनाजोगा घालवाल. आवडते छंद जोपासाल. मानसिक दृष्ट्‍या सक्षम व्हाल. धार्मिक कामात सहभागी व्हाल.

मकर:-

प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. वायफळ खर्च केला जाऊ शकतो. जुन्या विचारात अडकून राहू नका. नकारात्मकता दूर सारावी. दूरच्या नातेवाईकाशी संपर्क होईल.

कुंभ:-

विविध स्तरातून लाभ संभवतो. मनातील इच्छा पूर्ण कराल. जवळच्या मित्रांची गाठ घ्याल. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकेल. शेअर बाजारातून नफा मिळवू शकाल.

मीन:-

रखडलेले काम पूर्ण होईल. तसेच वैयक्तिक काम तडीस न्याल. वडीलांशी संबंध सुधारतील. कामात चंचलता आड आणू नका. हातातील कामातून समाधान मिळेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर