Today Rashi Bhavishya, 23 March 2023 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

खाण्यावर बेताने ताव मारा. विद्यार्थ्यांसमोर नवीन संधी चालून येईल. शेअर्स मध्ये गुंतवणूक करावी. मनातील चुकीचे विचार काढून टाकावेत. आशावादी दृष्टिकोन ठेवावा.

thane lok sabha seat, BJP s Sanjeev Naik, Launches Campaign in Thane, Emphasizes Charitable Birthday Celebration, sanjeev naik in thane lok sabha, mahayuti, shinde shivsena,
वाढदिवसाच्या निमित्ताने संजीव नाईक यांची मतपेरणी
budh planet will make neechbhang rajyog these zodiac sign could be lucky
बुध ग्रहामुळे ५० वर्षांनंतर तयार होणार ‘नीचभंग राजयोग’; ‘या’ ३ राशींच्या लोकांना अचानक होऊ शकतो धनलाभ
1st April Marathi Rashi Bhavishya
१ एप्रिल पंचांग: महिन्याचा पहिला दिवस मेष ते मीन राशीला कसा जाईल? ‘या’ राशींच्या लोकांसाठी धन व प्रगतीचे संकेत
Good Friday: 29th March Panchang & Rashi Bhavishya
२९ मार्च पंचांग: कर्क, मीनसह ‘या’ राशींच्या लोकांचं आज चारचौघात होईल कौतुक; शुक्रवारी कुणाला लाभेल वैभव

वृषभ:-

धार्मिक गोष्टीत प्रगती कराल. हवामानानुसार काही बदल करावेत. महत्त्वाची कामे पार पडतील. प्रामाणिकपणा व सचोटी सोडू नका. मित्रांची योग्य वेळी मदत मिळेल.

मिथुन:-

उपासनेमुळे काही त्रास कमी होतील. काही क्षणिक आनंद घ्याल. जबाबदारी सक्षमपणे पेलाल. निर्धास्तपणे वागू नका. जोडीदाराचे मत जाणून घ्यावे.

कर्क:-

जोडीदाराच्या कर्तृत्वाला वाव मिळेल. वडीलधार्‍यांशी मतभेद संभवतात. कौटुंबिक नाराजी दूर करावी. सार्वजनिक कामात कौतुक केले जाईल. नोकरदारांनी नरमाईची भूमिका घ्यावी.

सिंह:-

योग्य अयोग्याची शहानिशा करावी. भावनेच्या आहारी जाऊ नका. कलाकारांच्या कलेचे कौतुक केले जाईल. सांधेदुखीचा त्रास संभवतो. चटकन कोणावरही विश्वास ठेवू नका.

कन्या:-

धीर व संयम बाळगावा लागेल. आरोग्याच्या क्षुल्लक तक्रारी राहतील. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे. चारचौघात कौतुक केले जाईल.

तूळ:-

भावंडांशी वादाचे प्रसंग संभवतात. सारासार विचारातून कृती करावी. लॉटरी सारख्या व्यवहारातून फायदा संभवतो. देणी फेडता येतील. सासुरवाडीकडून शुभवार्ता मिळेल.

वृश्चिक:-

अधिक कष्टाची गरज पडेल. गणेशाची उपासना करावी. वैवाहिक सौख्यात मिठाचा खडा पडू देऊ नका. मनोरंजनाचे बेत आखले जातील. विरोधकांची संख्या वाढू शकते.

धनू:-

घरातील ताणतणाव दूर करावेत. ज्येष्ठ मंडळींचा सल्ला मानावा. कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये. आर्थिक व्यवहारात दक्षता बाळगावी. धार्मिक कामात मन गुंतवावे.

मकर:-

लेखन कलेला वाव मिळेल. चटकन मत प्रदर्शित करू नका. जुन्या गोष्टी उगाळत बसू नये. गरज पडल्यास शांत राहावे. आरोग्याची काळजी घ्यावी.

कुंभ:-

कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. सामुदायिक गोष्टींचे भान ठेवावे. घरातील कामात गुंग व्हाल. नवीन मित्र जोडावेत. आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढेल.

मीन:-

छंद जोपासायला वेळ द्या. अधिकारी व्यक्तींचा वेळोवेळी सल्ला घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. मनाविरुद्ध प्रवास करावा लागू शकतो. सडेतोडपणे मत मांडाल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर