scorecardresearch

Premium

Horoscope : राशीभविष्य, शनिवार २७ मे २०२३

Daily Rashi Bhavishya In Marathi : राशिभविष्यानुसार सिंह राशीच्या व्यक्तींनी दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीचा विचार करावा.

Today Horoscope
राशीभविष्य २७ मे २०२३ (Dainik Rashi Bhavishya)

मेष:-

अति कामामुळे थकवा जाणवेल. नसते साहस करायला जाऊ नका. प्रवासाला दिवस अनुकूल आहे. जमिनीची कामे सावधपणे करावीत. मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवावे.

वृषभ:-

सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. कौटुंबिक जबाबदार्‍या उत्तमरीत्या पार पाडाल. गायन कलेचे कौतुक केले जाईल.

Daily HHoroscope 9 october 2023
Daily Horoscope: ‘या’ राशीच्या व्यक्तींना होणार आर्थिक लाभ, पाहा तुमचे भविष्य
Daily Horoscope 6 october 2023
Daily Horoscope: कोणत्या राशीच्या लोकांनी फसवणूकीपासून सावध राहावे? पाहा तुमचे भविष्य
Daily Horoscope 23 September 2023
Daily Horoscope: वृषभसाठी दिवस फलदायी तर ‘या’ राशीच्या व्यक्तींनी कौटुंबिक ताणतणाव टाळावेत, पाहा तुमचे भविष्य
Daily Horoscoper 13 September 2023
Daily Horoscope: ‘या’ राशीच्या व्यक्तींनी जोडीदाराशी वाद करणे टाळावे, पाहा तुमचे भविष्य

मिथुन:-

सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. व्यवसायानिमित्त खर्च होईल. कामातील बदल लक्षात घ्यावेत. प्रवासात वाहन जपून चालवावे. आरोग्याची वेळेवर काळजी घ्यावी.

कर्क:-

सगळ्याच कामात दिरंगाई जाणवेल. सहकार्‍यांशी मतभेद संभवतात. कर्ज घेण्याचा विचार टाळावा. जुगारात नुकसान संभवते. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा लागेल.

सिंह:-

दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीचा विचार करावा. जीवावर उदार होऊ नका. विरोधक शांत राहतील. कौटुंबिक गोष्टी धीराने हाताळाव्यात. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे.

कन्या:-

भावंडांकडून त्रास संभवतो. मुलांच्या शिक्षणाची चिंता वाटेल. सहकार्‍यांचा हट्ट पुरवावा लागेल. अपचनाचा त्रास जाणवेल. आर्थिक कमाई वाढेल.

तूळ:-

काही गोष्टी अचानक सामोर्‍या येऊ शकतात. कामानिमित्त दूरच्या लोकांशी संबंध येऊ शकतो. क्षुल्लक गोष्टीवरून चिडचिड होऊ शकते. तुमच्याविषयी गैरसमज होऊ शकतात. विरोधकांकडे लक्ष ठेवावे लागेल.

वृश्चिक:-

अतिसाहस करायला जाऊ नका. घरातील वातावरण तप्त राहील. मुलांविषयी चिंता लागून राहील. शक्यतो मुलांच्या कलाने घ्यावे लागेल. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल.

धनू:-

मानसिक चिंता सतावतील. मनातील चुकीचे विचार काढून टाकावेत. सकस अन्न ग्रहण करावे. मोठे व्यावसायिक बदल करण्याचा विचार कराल. महत्त्वाकांक्षा बाळगावी लागेल.

मकर:-

प्रवासात खबरदारी घ्यावी. तुमच्यातील कलेला चांगली दाद मिळेल. मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींनी सजग राहावे. फक्त स्वत:च्या लाभाचा विचार करू नका. अनाठायी खर्च होईल.

कुंभ:-

बँकेची कामे सुरळीत पार पडतील. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी. कामाच्या ठिकाणी सावधपणे वागावे. सहकारी तुमच्यावर नाराज होऊ शकतात. वडीलधार्‍यांचा मान राखावा.

मीन:-

पत्नीचे सौख्य वाढीस लागेल. चारचौघांत तुमचा मान वाढेल. स्थावरची कामे मार्गी लागतील. घरातील स्त्रीवर्ग खुश असेल. तुमच्या कामाची योग्य दखल घेतली जाईल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Horoscope 27 may 2023 daily astrology rashi bhavishya in marathi tmb 01

First published on: 26-05-2023 at 19:02 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×