Premium

Horoscope : राशीभविष्य, रविवार २९ जानेवारी २०२३

Daily Rashi Bhavishya In Marathi : राशिभविष्यानुसार कन्या राशीच्या व्यक्ती कौटुंबिक कामात गुंतून राहातील. उत्तम वाहन सौख्य लाभेल.

Today Horoscope
राशीभविष्य १४ मे २०२३ (Dainik Rashi Bhavishya)

Today Rashi Bhavishya, 29 January 2023 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

लोकसत्ताची ही बातमी वाचण्यासाठी साइन-इन करा

मेष:-

वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे. वडीलधार्‍यांचे मत विचारात घ्यावे. वाहन चालवताना काळजी घ्यावी. क्षणिक गोष्टीने खट्टू होऊ नका. मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल.

वृषभ:-

मौल्यवान वस्तू खरेदी कराल. घरातील कामात रमून जाल. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. मनातील गैरसमज बाजूला ठेवावेत. विचारांची दिशा बदलून पहावी.

मिथुन:-

क्षुल्लक कारणावरून होणारे मतभेद टाळावेत. कामातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करावा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. उष्णतेचा त्रास जाणवेल. आरोग्याबाबत हयगय करू नका.

कर्क:-

अपचनाचा त्रास जाणवू शकतो. हातातील कामात यश येईल. उगाचच कोणाशीही वादात अडकू नका.  नातेवाईकांशी सलोखा ठेवावा. मनातील अनामिक भीती बाजूला सारावी.

सिंह:-

खेळात अधिक वेळ घालवाल. मुलांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. भागीदारीचा लाभ उठवावा. पोटाची काळजी घ्यावी लागेल.

कन्या:-

कौटुंबिक कामात गुंतून राहाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. जमिनीच्या कामात अधिक लक्ष घालावे. नवीन वाहन खरेदीचा विचार मनात डोकावून जाईल. जोडीदाराची उत्तम साथ राहील.

तूळ:-

जवळचा प्रवास करावा लागेल. कामाच्या ठिकाणी मान वाढेल. हातातील अधिकार योग्य वेळी वापरावेत. हितशत्रूंचा त्रास कमी होईल. कामाचे समाधान लाभेल.

वृश्चिक:-

मत्सराला बळी पडू नका. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. फसवणुकीपासून सावध राहावे. कामाची व्याप्ती वाढवता येईल. बोलतांना भान राखावे.

धनू:-

तुमची छाप पाडण्याचा प्रयत्न कराल. क्षुल्लक गोष्टीवरून चिडचिड करू नका. कौटुंबिक काळजी सतावत राहील. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे.

मकर:-

शांत व संयमी भूमिका घ्याल. जबाबदारी ओळखून वागावे. नवीन साहित्य वाचनात येईल. जमिनीच्या व्यवहारातून लाभ होईल. जवळचा प्रवास मजेत पार पडेल.

कुंभ:-

कामाचा ताण राहील. गप्पांची हौस पूर्ण करता येईल. चौकसपणा दाखवावा लागेल. आपले विचार उत्तमरीत्या मांडण्याचा प्रयत्न करावा. हट्टीपणा दूर सारावा लागेल.

मीन:-

झोपेची तक्रार जाणवेल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. कागदपत्रे नीट तपासून पहावीत. प्रलोभनापासून दूर राहावे. जामीनकीच्या व्यवहारात सावधानता बाळगावी.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 18:36 IST
Next Story
Tarot Card: २०२३ मध्ये ‘या’ राशीच्या महिला करतील राज्य! लक्ष्मीची साथ लाभून मिळेल बक्कळ पैसे कमावण्याची संधी
Exit mobile version