Today Rashi Bhavishya, 29 May 2023 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष:-
दिवस समाधानात जाईल. होकारात होकार मिसळावा लागेल. प्रसंगातील अनुकूलता लक्षात घ्यावी. अचानक समोर आलेल्या कामातून लाभ संभवतो. कामातील दिरंगाई टाळावी.
वृषभ:-
प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. नियमांना सोडून वागू नका. फसव्या मित्रांपासून सावध राहावे. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. वडिलोपार्जित कामातून धनप्राप्ती होईल.
मिथुन:-
काही वेळेस तारेवरची कसरत करावी लागू शकते. हातातील चांगली संधी सोडू नका. नियोजन करून कामे करावीत. प्रवासात भरकटू नका. वेळ वाया जाणार नाही याची दक्षता घ्या.
कर्क:-
कामाच्या ठिकाणी चिडचिड वाढू शकते. एकमेकांच्या सहकार्याने कामे करावीत. परदेशी कामातून लाभ संभवतो. मोहाला बळी पडू नका. खिशाला कात्री लागणार नाही याची काळजी घ्यावी.
सिंह:-
शक्यतो अकारण होणारे गैरसमज टाळावे लागतील. जोडीदाराशी मतभेद संभवतात. कोणत्याही गोष्टीची जास्त चिकित्सा करत बसू नका. प्रयत्नात कसूर करू नका. तुमच्या तिजोरीत भर पडेल.
कन्या:-
आत्मसंयमन करावे लागेल. अति धाडस करायला जाऊ नये. स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे. नियोजनबद्ध कामात सफल व्हाल. व्यावसायिक प्रवास सावधानतेने करावेत.
तूळ:-
जोडीदाराला अचानक लाभ होईल. जवळच्या लोकांना दुर्लक्षित करू नका. बेफिकिरीने वागून चालणार नाही. कठोर परिश्रमास पर्याय नाही. जवळचा प्रवास घडेल.
वृश्चिक:-
दिवसभर कार्यरत राहावे लागेल. भाऊबंदकीत वाद संभवतात. वाहन चालवताना सतर्क रहा. जोडीदाराचा शब्द प्रमाण मानावा लागेल. घरगुती कामात व्यस्त राहाल.
धनू:-
आज मनाप्रमाणे वागण्याचे ठरवाल. खेळाडूंनी कसरतीत कसूर करू नये. थोड्याशा यशाने उतू नका. सारासार विचारावर भर द्या. मधुमेहींनी खाण्याची पथ्ये पाळावीत.
मकर:-
सध्याच्या परिस्थितीत बिनधास्त वागून चालणार नाही. अध्यापक वर्गावर जबाबदारी वाढू शकते. जोडीदारासोबतचे वाद वाढू देऊ नका. वात विकार बळावू शकतात. मानसिक स्थैर्य जपावे.
कुंभ:-
दूरच्या व्यवहारात सावधानता बाळगावी. आततायीपणे वागून चालणार नाही. क्षुल्लक गोष्टींवर वाद घालू नका. कौटुंबिक जबाबदारी लक्षात घ्या. नवीन ओळखी वाढवाव्यात.
मीन:-
थोडी आक्रमक भूमिका घ्याल. स्त्री वर्गावरून वादाचा प्रसंग येऊ शकतो. कामात भावंडांचे सहकार्य घेता येईल. तांत्रिक बाबींमध्ये बारीक लक्ष घालावे. हातातील कामे सुरळीत पार पडतील.
– ज्योतिषी विद्याधर करंदीकर