Horoscope : राशीभविष्य, मंगळवार २९ नोव्हेंबर २०२२ | Horoscope 29 November 2022 Daily Astrology Rashi Bhavishya In Marathi msr 87 | Loksatta

Premium

Horoscope : राशीभविष्य, मंगळवार २९ नोव्हेंबर २०२२

Daily Rashi Bhavishya In Marathi: राशिभविष्यानुसार मिथुन राशीच्या व्यावसायिकांना चांगला दिवस. मुलांकडून आनंद वार्ता मिळतील.

Horoscope : राशीभविष्य, मंगळवार २९ नोव्हेंबर २०२२
राशीभविष्य ३१ डिसेंबर, (Dainik Rashi Bhavishya)

Today Rashi Bhavishya, 29 November 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

लोकसत्ताची ही बातमी वाचण्यासाठी साइन-इन करा

मेष:-

आजचा दिवस आव्हानात्मक असू शकेल. अधिक काम अंगावर पडू शकते. आज काहीशी धावपळ करावी लागू शकते. कामाचे पूर्ण नियंत्रण आपल्या हाती घ्यावे. इतरांच्या विश्वासाला पात्र ठराल.

वृषभ:-

घाईने निर्णय घेऊ नयेत. नवीन कामासाठी घाई करू नये. स्पर्धकांवर बारीक लक्ष ठेवावे लागेल. सारासार विचार हितकारक ठरेल. कुटुंबाला आधी प्राधान्य द्यावे.

मिथुन:-

व्यावसायिकांना चांगला दिवस. मुलांकडून आनंद वार्ता मिळतील. आर्थिक पातळी संतुलित राहील. मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल. मित्रांच्या गाठी-भेटी संभवतात.

कर्क:-

विवाहाची बोलणी पुढे सरकतील. सामाजिक मान वाढेल. संपर्कातील लोकांशी जवळीक वाढेल. एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकाल. समोरच्या व्यक्तीवर आपला प्रभाव पडेल.

सिंह:-

प्रवास संभवतो. संवादाने प्रश्न सुटू शकतील. नवीन ओळखी मित्रत्वात बदलतील. काही नवीन गोष्टी अनुभवास येतील.  विरोधक परास्त होतील.

कन्या:-

प्रलंबित येणी वसूल होतील. योग्य कामासाठी पैसा खर्च कराल. ज्येष्ठांच्या सेवेची संधी दवडू नका. मानसिक शांतता लाभेल. मित्रांची योग्य वेळी मदत होईल.

तूळ:-

थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल. हितशत्रूंकडे दुर्लक्ष करू नका. दिवस आव्हानात्मक असेल. धावपळ करावी लागू शकते. दिवसाच्या उत्तरार्धात परिस्थिती नियंत्रणात येईल.

वृश्चिक:-

वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. आपले मत इतरांना पट‍वून द्याल. व्यापारी वर्गाला शुभ दिवस. एखादा महत्त्वाचा निर्णय घेता येईल. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस.

धनू:-

एखादी महत्त्वाची इच्छा पूर्ण होईल. कामे सुरळीत पार पडतील. त्यामुळे मन प्रसन्न राहील. झोपेची काहीशी तक्रार जाणवेल. धनलाभाचे योग जुळून येतील.

मकर:-

समस्यांचे निराकरण होईल. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. उगाच नसत्या काळज्या करू नका. हातातील कामे योग्य रीतीने पार पडतील.  सकारात्मक परिणाम दिसू लागतील.   

कुंभ:-

गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आजचा दिवस यशकारक ठरेल. मेहनतीचा योग्य मोबदला मिळेल. लाभाच्या उत्तम संधी प्राप्त होऊ शकतील. वैवाहिक जीवन सुखमय राहील.

मीन:-

व्यावसायिक गुंतवणूक लाभदायक ठरेल. जोडीदाराची साथ मोलाची ठरेल. मिळकतीचे नवीन स्त्रोत उपलब्ध होतील. पालकांचे शुभाशिर्वाद मिळतील.  चांगला आर्थिक लाभ होईल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 17:56 IST
Next Story
‘त्रिग्रही राज योग’ बनल्याने ‘या’ ३ राशींचे भाग्य चमकणार? २०२३ घेऊन येईल प्रचंड धनलाभाची संधी