Today Rashi Bhavishya, 3 April 2023 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

मानसिक ताण नियंत्रित ठेवावा. फार दगदग करू नका. सर्वांना गोडीने आपलेसे कराल. तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल. लबाड लोकांपासून सावध राहावे.

11th April 2024 Panchang Guruvaar Marathi Rashi Bhavishya
११ एप्रिल, गुरुवार पंचांग: आज आयुष्यमान, सौभाग्य योग; तुमच्या राशीच्या कुंडलीत आज कोणत्या रूपात लाभेल गौरी कृपा?
10th April 2024 Panchang Mesh To Meen Rashi Bhavishya Today
१० एप्रिल पंचांग: तूळ, कर्कसहित ‘या’ राशी आज धनाढ्य होऊन इतरांनाही करतील मदत; आजचे १२ राशींचे भविष्य वाचा
1st April Marathi Rashi Bhavishya
१ एप्रिल पंचांग: महिन्याचा पहिला दिवस मेष ते मीन राशीला कसा जाईल? ‘या’ राशींच्या लोकांसाठी धन व प्रगतीचे संकेत
Good Friday: 29th March Panchang & Rashi Bhavishya
२९ मार्च पंचांग: कर्क, मीनसह ‘या’ राशींच्या लोकांचं आज चारचौघात होईल कौतुक; शुक्रवारी कुणाला लाभेल वैभव

वृषभ:-

मानसिक चंचलतेवर मात करावी लागेल. खर्चाला आळा घालावा लागेल. मनातील अनामिक भीती काढून टाकावी. चांगला व्यावसायिक लाभ संभवतो.

मिथुन:-

व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. कामात चांगली ऊर्जितावस्था येईल. चांगल्या कमाईसाठी नवीन धोरण ठरवावे. मित्रांची मदत घेता येईल. कामात प्रगतीला वाव आहे.

कर्क:-

कामाच्या स्वरुपात वारंवार बदल करू नका. चित्त एकाग्र करावे लागेल. घरगुती वस्तूंची खरेदी कराल. चारचौघांत तुमच्या प्रगतीचे कौतुक केले जाईल. महत्वाकांक्षी दृष्टिकोन ठेवावा.

सिंह:-

धार्मिक सेवेत सहभाग नोंदवाल. दूरच्या प्रवासाचा योग येईल. चांगल्या कामात सेवेला प्राधान्य द्याल. आदर्श वागणुकीतून कौतुकास पात्र व्हाल. तुमचा सामाजिक दर्जा सुधारेल.

कन्या:-

काही गोष्टी अकस्मात घडून येतील. चुकीच्या मार्गांपासून दूर राहावे. एककल्ली विचार करू नका. भागीदाराचे मत विचारात घ्यावे. मनातील संभ्रम बाजूस सारावेत.

तूळ:-

भागीदारीच्या व्यवसायात चांगला लाभ होईल. नवीन धोरण आजमावता येतील. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. योग्य नियोजनावर भर द्यावा. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

वृश्चिक:-

आरोग्यात सुधारणा दिसून येईल. क्षुल्लक गोष्टींचा त्रास करून घेऊ नका. मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचे आहे. प्रतिकूलतेतून मार्ग निघेल. आत्मविश्वास बाळगावा.

धनू:-

अभ्यासू दृष्टिकोन बाळगावा. स्व‍च्छंदीपणे विचार मांडाल. जुगाराची आवड पूर्ण कराल. मनाची संवेदनशीलता दर्शवाल. परिस्थितीची चांगली बाजू विचारात घ्याल.

मकर:-

विचारांची दिशा बदलून पहावी. भावंडांची काळजी लागून राहील. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. जवळचे नातेवाईक भेटतील. कौटुंबिक गोष्टीत प्रभुत्व दाखवाल.

कुंभ:-

बोलताना सारासार विचार करावा. हातातील अधिकाराचा योग्य वेळी वापर करता येईल. कामात प्रगतीला चांगला वाव आहे. नवीन कामात जोमाने उत्साह दाखवाल. जवळचा प्रवास घडेल.

मीन:-

घरगुती कामाचा ताण जाणवेल. विचारणा योग्य दिशा द्यावी. बौद्धिक ताण घेऊ नये. नवीन गोष्टीं मध्ये मन रमवावे. घरगुती जबाबदारी उत्तम रित्या पार पाडाल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर