Today Rashi Bhavishya, 3 February 2023 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. नवीन ओळखी वाढतील. गप्पांच्या मैफलीत रमून जाल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. दूरच्या प्रवासात काळजी घ्यावी.

Kapil Dev Says Some people will suffer but no one is bigger than the country
Kapil Dev : “काही लोकांना त्रास होईल, परंतु देशापेक्षा कोणीही…”, कपिल देव यांनी बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयाचे केले स्वागत
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
24 Year Old Women Pee Turned Black Like Cola Rush To ICU Are You Overdoing Perfect Ratio For Work and Exercise by dr Mehta
तुमचं शरीर किती थकतंय? ‘ही’ लक्षणे लगेच ओळखा; डॉ. मेहतांनी सांगितलं व्यायाम व कामाच्या वेळेचं परफेक्ट सूत्र
29 February Horoscope Marathi
२९ फेब्रुवारी, गुरुवार पंचांग: चार वर्षांतून एकदा येतो ‘हा’ खास दिवस! कसे असेल बारा राशींचे ग्रहमान, पाहा

वृषभ:-

कामात स्त्री वर्गाची मदत लाभेल. कमिशन मधून फायदा संभवतो. स्थावरच्या कामात लाभ होईल. जुनी येणी वसूल होतील. कलेचे योग्य मूल्यमापन केले जाईल.

मिथुन:-

चैनीच्या वस्तू खरेदी कराल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. तुमच्या कलेला चांगली प्रसिद्धी मिळेल. व्यावसायिक वातावरण चांगले राहील. मनाजोगी खरेदी कराल.

कर्क:-

मानसिक चंचलता जाणवेल. कल्पना शक्तीला वाव देता येईल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. वाचनाची आवड जोपासाल. परोपकारी दृष्टीकोन ठेवाल.

सिंह:-

जुन्या कामातून लाभ संभवतो. रेस-सत्ता यांतून लाभाची शक्यता. काही कामे विनासायास पार पडतील. कामाचा आनंद घेता येईल. मुलांच्या धडपडीकडे लक्ष ठेवा.

कन्या:-

उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. संपर्कातील लोकांचा सहवास वाढेल. भागिदारीतून चांगली कमाई होईल. कामाचे योग्य नियोजन करावे. घरगुती गोष्टींमध्ये अधिक लक्ष्य घाला.

तूळ:-

हातातील अधिकाराची योग्य जाणीव ठेवा. क्वचित प्रसंगी टीका होऊ शकते. स्व-मतावर आग्रही राहाल. कानाचे त्रास संभवतात. भावंडांची बाजू जाणून घ्यावी.

वृश्चिक:-

बोलण्याच्या भरात जबाबदारी घ्याल. दिवस खटपटीत  जाईल. लहरीपणाने वागू नका. दूर दृष्टीकोन ठेवावा लागेल. कष्टाला घाबरू नका.

धनू:-

स्व-बळावर कामे हाती घ्याल. आत्मविश्वास वाढीस लागेल. रागावर नियंत्रण ठेवा. वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी. स्वातंत्र्यप्रियता दर्शवाल.

मकर:-

सामुदायिक वादात अडकू नका. गैर-समजुती मुळे त्रास संभवतो. डोळ्यांची योग्य काळजी घ्यावी. उधार-उसनवारीचे व्यवहार सतर्कतेने करावेत.  काही कामे खिळून पडू शकतात.

कुंभ:-

कामाचा ताण जाणवेल. मुलांची चिंता लागून राहील. सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न कराल. मनातील प्रबळ इच्छेला महत्व द्यावे. प्रयत्नात कसूर करू नका.

मीन:-

काही अनपेक्षित बदल घडू शकतात. वडीलांचे मत विरोधी वाटू शकते. प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. हटवादीपणा करू नये. दर्जा टिकवण्याची धडपड कराल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर