scorecardresearch

Premium

Horoscope : राशीभविष्य, बुधवार ३१ मे २०२३

Daily Rashi Bhavishya In Marathi : राशिभविष्यानुसार धनू राशीच्या व्यक्तींना अती काटकसर करून चालणार नाही.

Today Horoscope
राशीभविष्य ३१ मे २०२३ (Dainik Rashi Bhavishya)

Today Rashi Bhavishya, 31 May 2023 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

काही गोष्टींबाबत फारच आग्रही राहाल. परिस्थिती अनुरूप विचार करावा. व्यवहार चातुर्य दाखवावे लागेल. धार्मिक कामातून मान मिळवाल. स्वत:बद्दलच्या चुकीच्या कल्पना मनातून काढून टाका.

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
sharad pawar narendra modi (1)
“पंतप्रधान मोदींचं ‘ते’ विधान क्लेशदायक”, शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका; दिले १९९३ च्या घडामोडींचे दाखले!

वृषभ:-

नवीन विचारांची कास धरावी. अती कर्मठपणे वागू नये. वडीलधार्‍या व्यक्तींचा मान राखावा. अती श्रमाचा थकवा जाणवेल. बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रगती करता येईल.

मिथुन:-

प्रतिकूलतेतून मार्ग काढावा लागेल. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. फसव्या लोकांपासून सावध राहावे. रेस, जुगार यांतून नुकसान संभवते. काही क्षणिक गोष्टींचा लाभ होईल.

कर्क:-

भागीदारीच्या व्यवसायात संयम बाळगावा लागेल. जोडीदाराच्या शांत स्वभावाचे कौतुक कराल. हातापायाला किरकोळ इजा संभवते. मनातील इच्छा मोकळेपणाने बोलून दाखवावी. अतीविचार करण्यात वेळ वाया जाईल.

सिंह:-

लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. वाट विकार बळावू शकतात. क्षुल्लक गोष्टींवरून मनस्तापाची शक्यता. कष्टाशिवाय पर्याय नाही. वादाच्या मुद्द्यांपासून दूर राहावे.

कन्या:-

इतरांचा विश्वास संपादन करावा. अती व्यवहारी वागून चालणार नाही. चिकाटीने कामे तडीस न्याल. वरिष्ठांची नाराजी दूर करावी लागेल. नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.

तूळ:-

स्थावरची कामे मार्गी लागतील. बर्‍याच दिवसांपासून रखडलेली कामे सुरू होतील. व्यवसायाच्या दृष्टीने काही नवीन योजना अंमलात आणाल. उत्तम गृहसौख्य लाभेल. मुलांचे स्वतंत्र विचार समजून घ्या.

वृश्चिक:-

कामानिमित्त प्रवास करावा लागेल. हातातील अधिकारात वाढ होईल. तुमच्यातील सुसंस्कृतपणा दिसून येईल. कौटुंबिक वातावरण तप्त राहील. काही गोष्टीत तडजोड स्वीकारावी लागेल.

धनू:-

इतरांच्या मदतीशिवाय कामे पूर्ण करावीत. वडिलोपार्जित कामांतून लाभ संभवतो. मोजकेच बोलण्यावर भर द्याल. आर्थिक बाबतीत विचारांती निर्णय घ्यावा. अती काटकसर करून चालणार नाही.

मकर:-

चटकन निराश होऊ नका. सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागेल. आरोग्याच्या बाबतीत चालढकल करू नका. अडथळ्यातून मार्ग निघेल. प्रौढपणे आपले विचार मांडावेत.

कुंभ:-

मानापमानाचे प्रसंग फार मनावर घेऊ नका. घराबाहेर वावरतांना सावध राहा. हित शत्रूंकडे लक्ष ठेवावे लागेल. आर्थिक गुंतवणूक तूर्तास टाळावी. क्षुल्लक गोष्टींवरून चिडचिड वाढू शकते.

मीन:-

मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घ्याल. तुमच्यातील कलेला चांगली दाद मिळेल. चार-चौघांत तुमचा दर्जा वाढेल. व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ होईल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-05-2023 at 19:02 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×