Rahu Nakshatra Gochar 2024: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे वेळोवेळी राशीपरिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन होते. ज्याचा प्रभाव १२ राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. राहू ग्रह जवळपास १८ वर्षांनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत राशीपरिवर्तन करतो. सध्या राहू बुध ग्रहाच्या रेवती नक्षत्रामध्ये उपस्थित असून तो ८ जुलै २०२४ रोजी शनिच्या उत्तराभाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. राहू ग्रहाच्या या नक्षत्र परिवर्तनाने काही राशीच्या व्यक्तींवर त्याचा शुभ परिणाम पाहायला मिळेल. या व्यक्तींच्या आयुष्या सुख-समाधान, संपत्तीचे सुख मिळेल.

वृषभ

राहू ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाने वृषभ राशीच्या व्यक्तींना त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील. या काळात वृषभ राशीच्या व्यक्तींना सुख-समृद्धी, पद-प्रतिष्ठा प्राप्त होईल. आकस्मिक धनलाभ होतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थितीदेखील मजबूत होईल. वैवाहिक जीवनदेखील सुखमय असेल, आपल्या पार्टनरसोबत सुखाचे क्षण व्यतीत कराल. प्रत्येक कामात यश मिळेल, नोकरीमध्येदेखील हवे तसे यश मिळवता येईल. स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे.

मकर

मकर राशीच्या व्यक्तींनादेखील राहूच्या नक्षत्र परिवर्तनाचे चांगले परिणाम पाहायला मिळतील. आयुष्यात आनंदाचे नवीन क्षण येतील. कार्यक्षेत्रात यश मिळवाल. नवी नोकरी शोधणाऱ्यांना हवी तशी नोकरी मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. खर्चावर नियंत्रण ठेवाल. भाग्याची पूर्ण साथ मिळेल. मित्रांसोबत पिकनिकचा प्लान कराल.

हेही वाचा: जून महिना देणार भरभराट; दोन ग्रह एकत्र करणार राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींची होणार चांदी

कुंभ

राहू ग्रहाचे नक्षत्रपरिवर्तन कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी सिद्ध होईल. या काळात कुंभ राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती मजबूत असेल, फक्त खर्च विचार करून करा. वायफळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील सदस्यांसोबत जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होतील, जुनी भांडणं विसरून जाल. तुमच्या वाणीमध्ये आणि वागण्यात नम्रता येईल. वैवाहिक आयुष्यातदेखील प्रेम अधिक निर्माण होईल, मुलांकडून आनंदवार्ता येतील.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)