Budh rashi parivartan: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे वेळोवेळी राशीपरिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन पाहायला मिळते. ज्याचा शुभ-अशुभ परिणाम प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. १४ जून रोजी बुध ग्रहाने मिथुन राशीत प्रवेश केला असून या राशीत तो २६ जूनपर्यंत राहील आणि २७ जून रोजी कर्क राशीत प्रवेश करेल. बुधाच्या या राशीपरिवर्तनाने ‘भद्र महापुरुष योग’ निर्माण होत आहे. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशींच्या व्यक्तींवर पडेल; पण काही राशींच्या व्यक्तींवर याचा अधिक प्रभाव पाहायला मिळेल. या काळात काही राशींच्या व्यक्तींचा भाग्योदयदेखील होईल.

ज्योतिषशास्त्रानुसार ‘भद्र महापुरुष राजयोग’ तेव्हा तयार होतो, जेव्हा बुध आपली स्वराशी असलेल्या कन्या किंवा मिथुन राशीत राशीपरिवर्तन करतो आणि लग्नापासून पहिल्या, चौथ्या, सातव्या किंवा दहाव्या घरात असतो, तेव्हा हा विशेष योग तयार होतो.

वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींना बुधाच्या राशीपरिवर्तनाने शुभ परिणाम पाहायला मिळतील. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींना बुधाच्या राशीपरिवर्तनाने चांगला परिणाम पाहायला मिळेल. या काळात आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल. वाणीवर नियंत्रण राहील, ज्यामुळे लोक तुमच्यावर इंप्रेस असतील. करिअरमध्ये हवे तसे यश मिळेल. आरोग्य समस्या दूर होतील. मेहनीचे पूर्ण फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल.

हेही वाचा: पुढचे २२० दिवस नुसता पैसा! राहूचे नक्षत्र परिवर्तन ‘या’ तीन राशीच्या लोकांना करणार मालामाल

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींना बुधाच्या राशीपरिवर्तनाने खूप सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लॅनदेखील कराल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)