Trigrahi Yoga: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो; ज्याचा प्रभाव १२ राशींच्या लोकांवर पाहायला मिळतो. सध्या भौतिक सुखाचा कारक ग्रह शुक्र आणि बुद्धी, वाणीचा कारक बुध हे ग्रह कर्क राशीत विराजमान आहेत. तसेच ग्रहांचा राजा सूर्य १६ जुलै रोजी कर्क राशीत प्रवेश करील. कर्क राशीत या तीन ग्रहांच्या युतीमुळे त्रिग्रही योग निर्माण होईल. कर्क राशीत हा त्रिग्रही योग १९ जुलैपर्यंत असेल. हा काळ १२ राशींतील काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी सिद्ध होईल. बुध, शुक्र व सूर्य यांच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिथुन

त्रिग्रही योगामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात शुभ परिणाम पाहायला मिळेल. या काळात तुमचे वैवाहिक जीवन सुखमय राहील. तुम्ही सकारात्मक राहाल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

सिंह

त्रिग्रही योगाचा फायदा सिंह राशीच्याव्यक्तींनादेखील होईल. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी येईल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळेल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. वैवाहिक आयुष्य सुखमय असेल, कुटुंबातील व्यक्तींची साथ मिळेल.

हेही वाचा: पैशांचा पाऊस पडणार! शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने ८७ दिवस ‘या’ तीन राशीधारकांना मिळणार पैसा अन् मान-सन्मान

वृश्चिक

त्रिग्रही योग वृश्चिक राशीच्या लोकांसाठीही अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. या काळात प्रत्येक कामात यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल. नवीन जबाबदाऱ्या मिळतील.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Horoscope after seven days under the influence of trigrahi yoga these three zodiac signs will earn position prestige and money sap
Show comments