Bhadra Rajyog : ज्योतिषशास्त्रानुसार जून महिन्यात शुक्र, बुध आणि सूर्य ग्रहांचे राशीपरिवर्तन होणार आहे. या महिन्यात बुध त्याची स्वराशी असलेल्या मिथुन राशीत प्रवेश करेल. वाणी, बुद्धिचा कारक ग्रह बुध १४ जून रोजी रात्री ११ वाजून ९ मिनिटांनी मिथुन राशीमध्ये प्रवेश करेल. बुधाच्या मिथुन राशीतील प्रवेशाने ‘भद्र राजयोग’ निर्माण होईल. हा राजयोग काही राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या राशीच्या व्यक्तींना करिअर, व्यवसायात यश मिळेल.

वृषभ

बुधाच्या मिथुन राशीतील प्रवेशाने निर्माण होणारा भद्र राजयोग वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात समस्यांपासून सुटका होईल. ताणतणाव दूर होण्यास मदत होईल, मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. सिंह राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. वाहन, मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण कराल. उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. समाजात तुमची लोकप्रियता वाढेल.

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींना देखील बुधाच्या मिथुन राशीतील प्रवेशाने अनुकूल परिणाम पाहायला मिळतील. या काळात तुमचा भाग्योदय होण्याची दाट शक्यता आहे. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल, फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल.

हेही वाचा: ४ दिवसांनंतर घरी नांदणार लक्ष्मी; ‘या’ पाच राशींच्या व्यक्तींचा सुरू होणार सुवर्णकाळ, मिळणार पद-प्रतिष्ठा अन् धन-संपत्तीचे सुख

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींना देखील भद्र राजयोगाचे शुभ परिणाम पाहायला मिळतील. नवीन कार्य सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे. वैवाहिक जीवन सुखमय असेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. कुटुंबातून आनंदी वार्ता येतील, करिअरमध्ये हवे तसे यश मिळवाल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)