Raj Yoga: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशीपरिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. जुलै महिन्यात कर्क राशीत अनेक ग्रहांचे राशी परिवर्तन होणार आहे. ज्यामुळे या राशीत शुक्रादित्य, बुधदित्य आणि लक्ष्मी नारायण हे तीन राजयोग निर्माण होतील. पंचांगानुसार, २९ जून रोजी बुध ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केला असून ७ जुलै रोजी शुक्र ग्रहाने देखील कर्क राशीत प्रवेश केला आहे. बुध आणि शुक्राच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण योग निर्माण झाला आहे. तसेच १६ जुलै रोजी सूर्य कर्क राशीत प्रवेश करील. ज्यामुळे सूर्य, बुध आणि शुक्र यांच्या युतीमुळे दुर्लभ राजयोग निर्माण होतील. ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीत सूर्य आणि बुध ग्रहाच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग निर्माण होईल. तसेच सूर्य आणि शुक्र ग्रहाच्या युतीमुळे शुक्रादित्य राजयोग निर्माण होईल. हे तिन्ही राजयोग खूप शुभ मानले जातात. या राजयोगांच्या प्रभावाने काही राशीच्या व्यक्तींना त्याच्या भरपूर फायदा होईल. कर्क कर्क राशीच्या व्यक्तींसाठी शुक्रादित्य, बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण राजयोग खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. तूळ शुक्रादित्य, बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण राजयोग तूळ राशीच्या व्यक्तींसाठी देखील खूप सकारात्मक सिद्ध होईल. या काळात तुमचे वैवाहिक जीवन सुखमय असेल. नोकरी-व्यापारात वाढ होईल. कामामुळे अनेकदा दूरचा प्रवास करावा लागेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल, त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. अडकलेले पैसे परत मिळतील. नव्या नोकरीची ऑफर मिळेल.अडचणींवर मात कराल, गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. हेही वाचा: सात दिवसांनंतर पैसाच पैसा! त्रिग्रही योगाच्या प्रभावाने ‘हे’ तीन राशीधारक कमावणार पद, प्रतिष्ठा अन् पैसा वृश्चिक वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी शुक्रादित्य, बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण राजयोग खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला तुमच्या आई-वडिलांची खूप साथ मिळेल. धार्मिक कार्यात आनंदाने सहभागी व्हाल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. (टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)