scorecardresearch

Premium

October Love Horoscope: ऑक्टोबर महिन्यात ‘या’ राशींच्या लोकांवर होऊ शकतो प्रेमाचा वर्षाव; तुमचीही रास यात आहे का? जाणून घ्या

बदलत्या ग्रहांच्या स्थितीमुळे येणाऱ्या दिवसांमध्ये काही राशींच्या लोकांवर प्रेमाचा वर्षाव होण्याची शक्यता आहे. या राशी कोणत्या आहेत?

october Love-Horoscope
बदलत्या ग्रहांच्या स्थितीमुळे येणाऱ्या दिवसांमध्ये काही राशींच्या लोकांवर प्रेमाचा वर्षाव होण्याची शक्यता आहे. (freepik)

ऑक्टोबर महिन्यात शुक्र, बुध या ग्रहांसह लोकांच्या प्रेम जीवनावर परिणाम करणाऱ्या अनेक नक्षत्रांची स्थिती बदलत आहे. बदलत्या ग्रहांच्या स्थितीमुळे येणाऱ्या दिवसांमध्ये काही राशींच्या लोकांवर प्रेमाचा वर्षाव होण्याची शक्यता आहे. या राशी कोणत्या आहेत? या महिन्यात त्यांचे प्रेम जीवन कसे असेल? तसेच वेगवेगळ्या ग्रहांचा त्यांच्या नातेसंबंधांवर कसा प्रभाव पडेल, याबद्दल आज आपण जाणून घेऊया.

  • वृश्चिक

या काळात तुम्ही प्रेम आणि नातेसंबंधात तुम्ही भाग्यवान सिद्ध होऊ शकता. एखाद्या मित्र किंवा नातेवाईकाच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे प्रेम भेटू शकते. तसेच, यावेळी तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते. जर तुम्ही एखाद्याच्या प्रेमात असाल तर या काळात तुम्हाला यश मिळू शकते.

Shardiya Navratri 2023
३० वर्षानंतर नवरात्रीला शुभ राजयोग घडल्याने ‘या’ राशींना होणार प्रचंड धनलाभ? शनिदेवाच्या कृपेने मिळू शकते अमाप संपत्ती
transit, october grah gochar 2023,
ऑक्टोबरमध्ये शुक्र-सूर्य, राहू-केतूसह ६ ग्रहांच्या चालीत बदल होताच ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु? अमाप संपत्ती मिळण्याची शक्यता
exercise at the age of 60
आरोग्य वार्ता : वयाच्या ६० व्या वर्षी किती व्यायाम करावा?
Suryagrahan 2023 the last solar eclipse of the year will create chaos in the lives of these 4 zodiac signs
Suryagrahan 2023 : वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण; ‘या’ चार राशींच्या लोकांच्या आयुष्यात होणार मोठे बदल
  • मकर

हा काळ या राशींच्या लोकांसाठी खूपच खास ठरू शकतो, कारण या महिन्यात या राशींच्या लोकांना आपले प्रेम सापडू शकते. मात्र हे नाते पुढे न्यायचे की नाही याबाबत तुमच्या मनात गोंधळ राहील. जे सध्या रिलेशनशिप मध्ये आहे त्यांच्या नात्यात ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. एकूणच या राशीच्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो.

  • मेष

तुम्हाला जर नातेसंबंध सुरु करायचे असतील तर हा काळ तुमच्यासाठी अतिशय चांगला सिद्ध होऊ शकतो. फक्त तुम्ही खरोखर प्रेमात आहात की हे केवळ आकर्षण आहे हे तुम्हाला ठरवावे लागेल. त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तीला प्रपोज करण्याआधी नीट विचार करा. जे जोडपे मूल होण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठीही हा महिना आनंद देणारा ठरू शकतो. तसेच जे लोक बऱ्याच काळापासून एकत्र आहेत, ते त्यांचे नाते पुढील स्तरावर घेऊन जाऊ शकतात. या महिन्यात तुमच्या प्रिय व्यक्तीकडून तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव होऊ शकतो.

  • सिंह

सिंह राशींच्या लोकांसाठीही हा काळ आनंद देणारा ठरू शकतो. या महिन्यात तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींसह काही क्षण एकांतात जगू शकता. तसेच, ज्यांना आपले नाते पुढे घेऊन जायचे आहे ते आपल्या जोडीदाराची कुटुंबियांशी ओळख करून देऊ शकतात. काही लोक आपल्या प्रिय व्यक्तीकडे प्रेमाची कबुली देऊन नवीन नातेही सुरु करू शकतात.

  • मीन

या दिवसांमध्ये तुमचे प्रेमसंबंध खूपच चांगले राहतील. नात्यातील प्रेम आणि सहकार्याची भावना वाढेल. तसेच, या काळात तुमचे व्यक्तिमत्त्व आणि वागणूक एखाद्याला आकर्षित करू शकते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Horoscope in the month of october the people of aries leo scorpio capricorn pisces zodiac sign may be showered with love pvp

First published on: 08-10-2022 at 08:23 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×