Jupiter Transit 2024: ज्योतिषशास्त्रानुसार देवगुरू बृहस्पतींना ज्ञान, समृद्धी, भाग्याचे कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तींच्या कुंडलीत गुरु शुभ स्थानी असतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यात अनेक शुभ परिणाम पाहायला मिळतात. सध्या मार्गी झाले असून सध्या ते वृषभ राशीत उपस्थित आहेत. ऑक्टोबर महिन्यापासून गुरु प्रतिगामी होईल, तोपर्यंत ११८ दिवस १२ राशीपैंकी काही राशींच्या व्यक्तींना त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील.

वृषभ

पुढचे ११८ दिवस वृषभ राशीच्या व्यक्तींसाठीदेखील सकारात्मक असतील. या काळात अनेक शुभ परिणाम पाहायला मिळतील. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.

कर्क

पुढचे ११८ दिवस कर्क राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल असतील. या काळात तुमचा भाग्योदय होण्याची दाट शक्यता आहे. करिअरमध्ये हवे तसे यश संपादित कराल. कुटुंबात सौख्याचे वातावरण राहील, जुने वाद संपतील. आयुष्यात आनंदी आनंद असेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. या काळात तीर्थस्थानांना भेट द्याल. गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल.

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी पुढचे ११८ दिवस शुभ परिणाम देणारे असतील. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. या राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. वाहन, स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबीयांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. आरोग्य उत्तम राहील, फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.

हेही वाचा: ६ जुलैपर्यंत शुक्राचा प्रभाव! ‘या’ चार राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा, समृद्धी व ऐश्वर्याचे सुख

धनु

धनु राशीच्या व्यक्तींसाठीदेखील पुढचे ११८ दिवस खूप लाभदायी असतील. या राशीच्या व्यक्तींना अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लॅनदेखील कराल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच प्रमोशनही मिळेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)