Lakshmi Narayan Yoga: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचे वेळोवेळी राशीपरिवर्तन होत असते. जून महिन्यात मिथुन राशीमध्ये बुध, सूर्य आणि शुक्र या तीन ग्रहांचा संयोग निर्माण होणार आहे. १२ जून रोजी संध्याकाळी ६ वाजून ३७ मिनिटांनी भौतिक सुखाचा कारक ग्रह मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. शिवाय त्यानंतर १४ जून रोजी ११ वाजून ०९ मिनिटांनी बुध ग्रह मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. बुध आणि शुक्र ग्रहाच्या मिथुन राशीतील प्रवेशाने ‘लक्ष्मी नारायण योग’ निर्माण होईल. हा योग ज्योतिषशास्त्रात खूप शुभ मानला जातो. ज्याचा प्रभाव काही राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी सिद्ध होईल. या काळात या राशीच्या व्यक्तींना ज्ञान आणि भौतिक सुखाची प्राप्ती होईल.

हेही वाचा: २६८ दिवस घरी नांदणार लक्ष्मी; शनीची चाल करणार ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना करणार मालामाल

laxmi narayan yoga influence of Mercury-Venus four zodiac sign are happy
पैसाच पैसा! पुढचे सहा दिवस बुध-शुक्राच्या प्रभावाने ‘या’ चार राशीधारकांच्या आयुष्यात येणार आनंदी आनंद
pl Deshpande, sunita Deshpande
हरिश्चंद्राची बहीण.. : औदार्याचा विलक्षण अनुभव
Sun transit in cancer 2024 zodic sign three zodiac signs will shine and wealth
१६ जुलैपासून पैसाच पैसा! एक महिना ‘या’ तीन राशीधारकांचे चमकणार भाग्य; मिळणार मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा
Three raj yogas will be created in Cancer These zodiac signs
देवी लक्ष्मी देणार बक्कळ पैसा! कर्क राशीत निर्माण होणार तीन राजयोग; ‘या’ तीन राशींना मिळणार ऐश्वर्याचे सुख
Shukra Gochar 2024 in Kark
लक्ष्मी नारायण योग पुढील २३ दिवस ‘या’ ५ राशींना देईल प्रचंड धन-दौलत; नशिबात राजासारखं जीवन जगण्याची संधी
Sun-Venus will enter Cancer sign after almost 5 years
तब्बल ५ वर्षानंतर कर्क राशीत सूर्य-शुक्र करणार प्रवेश; ‘या’ तीन राशींच्या लोकांना होणार अचानक धनलाभ
Saturn Moon conjunction will create shashi Yoga
पैसाच पैसा! शनी-चंद्राच्या युतीमुळे निर्माण होणार शशि योग; ‘या’ चार राशीच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
transit of the Sun the persons of these three signs will get a lot of money
३० दिवस असणार देवी लक्ष्मीची कृपा! सूर्याच्या राशीपरिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार भरपूर पैसा

मेष

मेष राशीच्या व्यक्तींना लक्ष्मी नारायण योगामुळे खूप शुभ परिणाम पाहायला मिळतील. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी देखील हा योग खूप सकारात्मक बदल घेऊन येईल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल.

हेही वाचा: जून महिना भरभराटीचा; वृषभ राशीत पाच ग्रहांचा संयोग, ‘या’ पाच राशींचे लोक कमावणार बक्कळ पैसा

कुंभ

बुध आणि शुक्र ग्रहाची युती कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)