Transit of Mars: ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती म्हटले जाते. जून महिन्याच्या सुरुवातीलाच मंगळ ग्रहाने राशी परिवर्तन केले होते. सध्या मंगळ त्याची स्वराशी असलेल्या मेष राशीत विराजमान असून, मंगळाचे पुढचे राशी परिवर्तन जुलै महिन्यात पाहायला मिळेल. मंगळ जुलै महिन्यात वृषभ राशीत प्रवेश करील. मंगळाचे हे राशी परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप खास ठरेल. दरम्यान, येणारे ३२ दिवस मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे काही राशींच्या व्यक्तींना शुभ परिणाम पाहायला मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाला साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तींच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो, असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात.

मेष

मंगळ मेष राशीचा स्वामी ग्रह आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींवर नेहमीच मंगळाची कृपा असते. मंगळाच्या प्रभावाने या व्यक्तींचा साहस, पराक्रम वाढेल. या काळात त्यांची आर्थिक स्थिती उत्तम राहून, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. नव्या वस्तू खरेदी कराल. अविवाहितांची लग्ने जुळतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल.

धनु

धनु राशीच्या व्यक्तींनादेखील मंगळाच्या राशीतील परिवर्तनाचा चांगला फायदा होईल. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल. नोकरीत प्रमोशन मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल.

हेही वाचा: बक्कळ पैसा कमावणार! तब्बल १० वर्षांनंतर मिथुन राशीत निर्माण होणार ‘त्रिग्रही योग’; ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य

मीन

मंगळाचे संक्रमण मीन राशीच्या व्यक्तींसाठी शुभ फळ देणारे असेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. तीर्थक्षेत्रांना भेटी द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जाल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

(टीप : सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Horoscope mars will make goods for the next 32 days these three zodiac persons will get new job salary increase sap
Show comments