Shani Vakri: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशीपरिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. ज्यावेळी ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला गोचर, मार्गी आणि वक्री असे म्हटले जाते. ग्रहांची वक्री स्थिती उलट गतीशी संबंधित असते. शनि सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीमध्ये उपस्थित असून नवग्रहात न्यायप्रिय असलेले शनिदेव २९ जून रोजी वक्री होतील, ते जवळपास १३५ दिवस वक्री असतील. शनिच्या वक्री होण्याने १२ राशीतील काही राशींच्या व्यक्तींना अनेक फायदे होण्याची शक्यता आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की, जे लोक नेहमी न्यायाचे पालन करतात आणि चांगले कर्म करतात अशा व्यक्तींवर शनिदेवाची सदैव कृपा असते.

Shani Copper Effect In Gochar Kundali Of These Three Rashi Saturn Effect of Sadesati
शनी निघाले तांब्याच्या पावलांनी, ‘या’ ३ राशींच्या कुंडलीत बक्कळ धनलाभ; तुम्हाला मिळेल का पेढे वाटण्याची गोड संधी?
For the next 76 days, the fortunes of these three zodiac signs
पुढचे ७६ दिवस ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; बुध देणार यश, कीर्ती अन् बक्कळ पैसा
Shani Maharaj Become Dhani Of These Three Rashi More Money
२०२५ पर्यंत शनी ‘या’ राशींचे धनी होणार! गडगंज श्रीमंती व सुखाने न्हाऊन निघाल, वाचा, तुम्हालाही मिळणार का पेढे वाटण्याची संधी
Chaturgrahi Yog 2024
उद्यापासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? १०० वर्षांनी ४ ग्रहांची महायुती होताच लक्ष्मी येईल दारी!
31st May Lakshmi narayan Yog After 12 Months
१२ महिन्यांनी लक्ष्मी नारायण येतायत घरी! ३१ मेपासून महिनाभरात ‘या’ राशींचे दिवस पालटणार; नशिबात प्रचंड धन, आरोग्य, प्रेम
Shani Dev Krupa
शनिदेवाच्या कृपेने ‘या’ राशींचे बदलेल भाग्य? ८८ दिवस मिळेल भरपूर पैसा? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
Budh Ast 2024
२ जूनपासून ‘या’ राशी होणार श्रीमंत, बदलतील दिवस? बुधदेव अस्त स्थितीत येऊन करु शकतात धनवर्षा, दारी येईल लक्ष्मी!
Shani jayanti on 6th June 2024 Five Zodiac Signs Life To Take Turn
६ जूनला शनी जयंतीपासून 5 राशींच्या नशिबाला मिळेल कलाटणी; पावसाआधी बरसणार धन व सुख, तुम्ही आहात का नशीबवान?

वृषभ

शनिदेवाची वक्री चाल वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी सिद्ध होईल. या काळात तुम्हाल तुमच्या आई-वडिलांची खूप साथ मिळेल. धार्मिक कार्यात आनंदाने सहभागी व्हाल. १३५ दिवसाच्या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे.

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी देखील शनिदेवाची वक्री चाल खूप नवे बदल घडवून आणेल. या काळात कन्या राशीच्या व्यक्तींचे वैवाहिक जीवन सुखमय असेल. अविवाहित असाल तर लग्नाचे प्रस्ताव येतील. नोकरी-व्यापारात वाढ होईल. कामामुळे अनेकदा दूरचा प्रवास करावा लागेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल, त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. अडकलेले पैसे परत मिळतील. नव्या नोकरीची ऑफर मिळेल.अडचणींवर मात कराल, गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल.

हेही वाचा: ४१ दिवस नुसता पैसा; मंगळाच्या जबरदस्त प्रभावाने ‘या’ तीन राशी होणार प्रचंड मालामाल

कुंभ

कुंभ ही शनिची स्वराशी असून शनिची वक्री चाल १३५ दिवस कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)