Sun Transit In Pushya: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. त्याचा प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ग्रहांचा राजा सूर्य १४ जुलै रोजी पुष्य नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. या नक्षत्राचे स्वामी शनी देव आहेत. त्यामुळे सूर्याच्या पुष्य नक्षत्रातील प्रवेशाचा प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. मिथुन सूर्याच्या पुष्य नक्षत्रातील प्रवेशाने मिथुन राशीच्या व्यक्तींना शुभ फळाची प्राप्ती होईल. या काळात आकस्मिक धनलाभ होईल. करिअरमध्ये यश मिळेल. नवीन लोकांबरोबर ओळख होईल. घरात शांतीचे आणि आनंदाचे वातावरण असेल. या काळात सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात खूप प्रगती कराल. मुलांबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्क कर्क राशींच्या व्यक्तींना सूर्याच्या पुष्य नक्षत्रातील प्रवेशाने अनुकूल परिणाम पाहायला मिळेल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. या काळात आत्मविश्वास वाढेल. नोकरी, व्यवसायात फायदा होईल. कामाच्या निमित्ताने दूरचे प्रवास करावे लागतील. तुमचे ध्येय प्राप्त करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. व्यवसायात बऱ्याचदा अपयशाला सामोरे जावे लागेल. वैवाहिक जीवनातही मतभेद होतील. हेही वाचा: पुढचे ६३ दिवस कमावणार भरपूर पैसा; केतूच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशी होणार मालामाल वृश्चिक सूर्याच्या पुष्य नक्षत्रातील प्रवेशाने वृश्चिक राशीच्या व्यक्तींना खूप शुभ परिणाम पाहायला मिळतील. या काळात तुमचा मानसिक आणि शारीरिक तणाव कमी होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. तुमचे वैवाहिक जीवन सुखमय राहील. जुने वाद मिटतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. या काळात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. (टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)