Mercury Sun Transit: ज्योतिषशास्त्रानुसार मे महिन्यात काही ग्रहांचे राशीपरिवर्तन होणार आहे ज्याचा प्रभाव १२ राशीच्या व्यक्तींवर विविध प्रकारे पाहायला मिळेल. १० मे रोजी मेष राशीत वाणी, बुद्धीचा कारक ग्रह असणाऱ्या बुध ग्रहाचे राशीपरिवर्तन झाले. याआधी मेष राशीत सूर्याचे राशीपरिवर्तन झाले होते, त्यामुळे आता मेष राशीत बुध आणि सूर्याची युती झाली असून बुधादित्य राजयोग निर्माण झाला आहे. या योगामुळे काही राशींच्या व्यक्तींना त्याचा चांगला फायदा होईल.

ज्योतिषशास्त्रात बुधादित्य राजयोगाला खूप महत्वपूर्ण आणि शुभ मानले जाते. या योगामुळे व्यक्तीच्या आयुष्यात धन, सुख-समृद्धी, मान-सन्मान, बुद्धी प्राप्त होते. मेष राशीत निर्माण झालेल्या या राजयोगामुळे तीन राशींच्या व्यक्तींना त्याचा फायदा होईल.

मेष

मेष राशीमध्येच बुध आणि सूर्याची युती निर्माण होत असल्यामुळे या राशीच्या व्यक्तींसाठी हा योग खूप शुभ फळ देईल. या काळात अनेकदा आकस्मिक धनलाभ होतील. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. अडकलेले पैसे परत मिळतील. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. कुटुंबात शुभ कार्ये होतील. मार्केटिंग, मीडिया, बँक व शिक्षण या क्षेत्रांतील व्यक्तींना यश मिळेल. या काळात आरोग्य उत्तम राहील. तुम्ही सकारात्मक विचार कराल.

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींना देखील बुधादित्य राजयोग भाग्यकारक ठरेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. नवे वाहन, घर, जमीन खरेदी करू शकता. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल.

हेही वाचा: २०२५ पर्यंत मिळणार श्रीमंतीचे सुख! राहूच्या प्रभावाने ‘या’ राशींचे चमकणार भाग्य

तूळ

मेष राशीतील सूर्य आणि बुधाची युती तूळ राशीच्या व्यक्तींसाठी देखील खूप लाभकारी सिद्ध होईल. व्यवसायात वाढ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक आयुष्य देखील सुखमय राहील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची आणि सहकार्यांची मदत प्राप्त होईल. अडचणींवर मात कराल, गंतवणूक करणे फायद्याचे ठरेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)