मेष:- 

नातेवाईक भेटीला येतील. आजचा दिवस मजेत जाईल. आपले विचार सर्वांसमोर निर्भयपणे मांडाल. त्रास देणार्‍या लोकांपासून दूर राहावे. महिलांना अधिक श्रम घ्यावे लागतील.

वृषभ:-

आजचा दिवस नवीन ऊर्जा देणारा असेल. फिरायला जाण्याचे प्लॅनिंग कराल. विद्यार्थ्यांना आव्हानात्मक दिवस. कौटुंबिक जीवनात चांगले परिणाम मिळतील. प्रेमी मंडळींना चांगला दिवस.

मिथुन:-

कौटुंबिक आनंद मिळवाल. घरातील तक्रारी मिटवाल. आईच्या तब्येतीत फरक दिसून येईल. नवीन खरेदीचा आनंद घ्याल. नवीन वाहन घेण्याची इच्छा मनात जागृत होईल.

कर्क:-

घरातील जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. तुमचा मान वाढेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. लहानांसोबत वेळ घालवाल. अति विचार करू नका.

सिंह:-

बोलण्यातून प्रभाव पाडाल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. व्यवसायिकांना चांगला लाभ होईल. कार्यक्षेत्रातून भेटवस्तू मिळतील. इतरांच्या विचारांना देखील प्राधान्य द्या.

कन्या:-

आजचा दिवस धावपळीचा असेल. परंतु मानसिक सौख्य लाभेल. कामे पूर्ण झाल्याने समाधानी असाल. आवडीच्या वस्तू खरेदी कराल. बजेट बिघडणार नाही याची दक्षता घ्या.

तूळ:-

पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. परंतु हा पैसा घरातील गोष्टींवर खर्च होईल. खरेदीचा मनापासून  आनंद घ्याल. व्यवसायिकांना दिवस चांगला जाईल. दूरवर व्यापार विस्तार करता येईल.

वृश्चिक:-

मानसिक चंचलता जाणवेल. आपल्या मतांवर ठाम राहावे. इच्छा नसताना प्रवास करावा लागेल. प्रवास फायदेशीर ठरेल. थकवा दूर पळून जाईल.

धनू:-

घरातील लोकांसोबत अधिक वेळ घालवाल. नवीन संधी सोडू नका. घरातील लोकांना खुश कराल. अधिकारी व्यक्तींचा सल्ला घेता येईल. वरिष्ठांशी महत्त्वाची बोलणी करता येतील.

मकर:-

कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम पहायला मिळतील. थोरांची सेवा करण्याची संधी मिळेल. वेळेचा सदुपयोग करून घ्यावा. रखडलेली कामे पूर्ण करता येतील. घरातील वातावरण चांगले राहील.

कुंभ:-

आज अचानक धनलाभाची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. धार्मिक स्थळांना भेट देता येईल. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. पोटाचे विकार संभवतात.

मीन:-

अतिविचार करत बसू नका. मानसिक चंचलता जाणवेल. जोडीदाराची बाजू समजून  घ्यावी. सामाजिक स्तर सुधारेल. वैवाहिक जीवनातील कटुता टाळावी.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर