मेष:-

कौटुंबिक जबाबदारी आनंदाने पार पाडाल. अनाठायी खर्च केला जाईल. कलात्मक दृष्टिकोन ठेवावा. आवडी-निवडी बाबत आग्रही राहाल. सर्वांना प्रेमळपणे आपलेसे कराल.

वृषभ:-

चारचौघांत मिळून मिसळून वागाल. मनाप्रमाणे हौस पूर्ण करून घ्याल. काम व वेळ यांचे गणित जमवावे लागेल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. अनावश्यक खर्च टाळावा.

मिथुन:-

गरज नसलेल्या वस्तू खरेदी केल्या जातील. मानसिक गोंधळ टाळावा. प्रलोभनाला भुलून जाऊ नका. स्त्री सौख्याचा लाभ होईल. प्रवासाचा योग येईल.

कर्क:-

चैनीच्या वस्तू खरेदी कराल. व्यापारी वर्ग अपेक्षित लाभाने खुश राहील. जवळचे मित्र भेटतील. मनमोकळ्या गप्पा मारल्या जातील. मनातील अपेक्षा पूर्ण होतील.

सिंह:-

कामातून आनंद मिळेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. कामातील सुसंगतता व स्थैर्य जपाल. वडीलधार्‍यांचा आशीर्वाद लाभेल. कामाच्या ठिकाणी तुमचा मान वाढेल.

कन्या:-

धार्मिक ग्रंथ वाचाल. इतरांच्या आनंदाने खुश व्हाल. फक्त कामावरच लक्ष केंद्रीत करावे. वरिष्ठांच्या नाराजीचे कारण बनू नका. दिरंगाईतून मार्ग काढावा लागेल.

तूळ:-

हातातील वेळेचा सदुपयोग करा. मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या.  आर्थिक व्यवहार जपून करावेत. उगाचच चीड-चीड करू नका. नसते साहस अंगाशी येऊ शकते.

वृश्चिक:-

कौटुंबिक कलह शांततेने सोडवावा. पत्नीची नाराजी दूर करावी लागेल. भागिदारीतून चांगला लाभ होईल. संपर्कातील लोकांकडून मदत मिळेल. चारचौघांत कौतुकास पात्र व्हाल.

धनू:-

अडचणीतून वेळीच मार्ग निघेल. सहकार्‍यांची योग्य वेळी मदत मिळेल. आरोग्यात सुधारणा होईल. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. मनातील काळजी दूर होईल.

मकर:-

मुलांचे वागणे बिनधास्त वाटू शकते. आपले कलागुण जतन करण्याचा प्रयत्न करावा. बोलतांना इतरांचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. फसवणुकीपासून सावध राहावे. संयम सोडू नका.

कुंभ:-

बर्‍याच गोष्टी सामोपचाराने हाताळाव्यात. वडीलधार्‍याच्या तब्येतीची काळजी घ्यावी. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. कौटुंबिक जिव्हाळा जतन करावा. थोरांचे विचार जाणून घ्यावेत.

मीन:-

जवळच्या ठिकाणाला भेट देता येईल. मित्रमंडळींचा गोतावळा जमवाल. वादाचे मुद्दे लांब ठेवावेत. सामुदायिक जाणीव जागृत ठेवावी. हाती घेतलेले काम तडीस न्याल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर