Today Rashi Bhavishya, 05 August 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य. मेष (Aries Horoscope Today ):- मानमरातब वाढेल. सामाजिक जाणीव ठेवून वागाल. मित्रांचे संपूर्ण सहकार्य लाभेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आध्यात्मिक आवड वाढेल. वृषभ (Taurus Horoscope Today ):- स्थावर मालमत्तेच्या कामातून लाभ होईल. घरात चांगल्या बातम्या येतील. तुमच्या पराक्रमात वाढ होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. इच्छापूर्तीचा दिवस. मिथुन (Gemini Horoscope Today ):- दिवसाची सुरुवात आनंदी होईल. आज तुमच्या मनातील इच्छेला अधिक बळ मिळेल. अडचणीतून मार्ग निघेल. दिवस कार्यपूर्तीत जाईल. गोष्टी मनासारख्या घडून येतील. कर्क (Cancer Horoscope Today ):- मानसिक चिंतेला बाजूला सारावे. स्वत:विषयीच्या चुकीच्या कल्पना काढून टाका. लपवाछपवीची कामे करू नका. बदलाची अपेक्षा कराल. अतिउत्साह दाखवायला जाऊ नका. सिंह (Leo Horoscope Today ):- मनोवांच्छित लाभेल. चर्चेतून कोंडी फुटेल. वाहन जपून चालवावे. भविष्या संदर्भातील एखादी योजना आखाल. निराशेतून मार्ग काढाल. कन्या (Virgo Horoscope Today ):- नवीन सोयी कराल. कामापेक्षा इतर गोष्टींकडे लक्ष जाईल. व्यापारीवर्ग खूश राहील. धावपळीतून यशाचा मार्ग खुला होईल. प्रलंबित कामे पूर्ण करावीत. तूळ (Libra Horoscope Today ):- नवीन गोष्टीत रमून जाल. व्यवहार सावधानतेने करावेत. तुमच्या मान सन्मानात वाढ होईल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. कामात सुलभता येईल. वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):- टोकाची भूमिका घेऊ नका. अचानक धनलाभ होऊ शकतो. शेअर्सच्या कामातून लाभ संभवतो. काही कामे कमी श्रमात पार पडतील. हातातील कामातून समाधान लाभेल. धनू (Sagittarius Horoscope Today ):- आज जोडीदार तुमच्यावर खूश राहील. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. भागीदाराशी सलोखा वाढेल. तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल. बोलण्यातील व्यर्थता टाळावी. मकर (Capricorn Horoscope Today ):- कामाच्या ठिकाणी प्रशंसा केली जाईल. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. कामाचा उरक वाढेल. उगाच वादात पडू नका. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. कुंभ (Aquarius Horoscope Today ):- आज दिवसभर मौजमजा कराल. मित्रांचा फड जमवण्याचा प्रयत्न कराल. करमणूक प्रधान दिवस राहील. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. विनाकारण तर्क-वितर्क करू नका. मीन (Pisces Horoscope Today ):- कौटुंबिक बाबीत यश मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील. अनावश्यक खर्चात वाढ होण्याची शक्यता. हितशत्रू परास्त होतील. जोडीदाराच्या भावना समजून घ्या. – ज्योतिषी विद्याधर करंदीकर