Today Rashi Bhavishya, 06 October 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष (Aries Horoscope Today ):-

Hanuman Jayanti
Hanuman Jayanti : हनुमान जयंतीच्या दिवशी मंगळ गोचरमुळे ‘या’ राशींचे नशीब चमकरणार, मिळणार बक्कळ पैसा?
21st April Panchang Daily Marathi Horoscope Sarvarth Siddhi Yog
२१ एप्रिल पंचांग: आजचा सर्वार्थ सिद्धी योग १२ पैकी ‘या’ राशींना देईल मान व धन; रविवारी कुणाचं नशीब चमकणार?
11th April 2024 Panchang Guruvaar Marathi Rashi Bhavishya
११ एप्रिल, गुरुवार पंचांग: आज आयुष्यमान, सौभाग्य योग; तुमच्या राशीच्या कुंडलीत आज कोणत्या रूपात लाभेल गौरी कृपा?
10th April 2024 Panchang Mesh To Meen Rashi Bhavishya Today
१० एप्रिल पंचांग: तूळ, कर्कसहित ‘या’ राशी आज धनाढ्य होऊन इतरांनाही करतील मदत; आजचे १२ राशींचे भविष्य वाचा

काम करताना डोक्यावर फार ताण घेऊ नका. खूप दिवसांपासून राहिलेले वाचन पूर्ण कराल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. कामातून समाधान मिळवाल. अनावश्यक तर्क-वितर्क करू नयेत.

वृषभ (Taurus Horoscope Today ):-

मुलांकडून आनंद मिळेल. जुनी येणी वसूल होतील. आपला दिवस चांगला जाईल. मनातील चुकीच्या विचारांना थारा देऊ नका. मित्रांविषयी मनात ग्रह करून घेऊ नका.

मिथुन (Gemini Horoscope Today ):-

घरातील कामात व्यस्त राहाल. कामात जोडीदाराची मदत होईल. कामात काही स्वाभाविक बदल संभवतात. स्वत:ला सिद्ध करण्याची संधी सोडू नका. कठीण कामात चिकाटी सोडू नका.

कर्क (Cancer Horoscope Today ):-

विद्यार्थ्यानी मेहनतीला कमी पडू नये. नवीन जबाबदारी अंगावर पडण्याची शक्यता. आवडीचे पदार्थ चाखाल. जवळच्या प्रवासात समानाची काळजी घ्या. नातेवाईकांची गाठ पडेल.

सिंह (Leo Horoscope Today ):-

स्वत:वर पूर्ण आत्मविश्वास ठेवा. दिवस चांगला जाईल. कौटुंबिक जबाबदारी उत्तम पार पाडाल. जुन्या मित्रांशी संपर्क साधला जाईल. प्रेमातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस.

कन्या (Virgo Horoscope Today ):-

वैचारिक भावना वाढीस लागेल. घरातील लोकांचे सल्ले उपयोगी येतील. अधिक श्रम उपसावे लागू शकतात. एखादे जबाबदारीचे काम अंगावर पडू शकते. जोडीदाराची गरज लक्षात घ्या.

तूळ (Libra Horoscope Today ):-

व्यवसायात अधिकार प्राप्त होतील. दिवसाची सुरुवात संमिश्र असेल. दैनंदिन कामात अडथळे येऊ शकतात. मात्र आपण त्यातून मार्ग काढू शकाल. नातेसंबंध दृढ होतील.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):-

नोकरीत मनासारखे काम मिळेल.  कोणताही निर्णय तडकाफडकी घेऊ नये. प्रेमातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस. नवीन ओळख होईल. येणार्‍या काळात ओळखीचा फायदा होईल.

धनू (Sagittarius Horoscope Today ):-

आत्मविश्वासाने कामे कराल. मनात संशयाला थारा देऊ नका. तुमचे मार्गदर्शन इतरांना लाभदायक ठरेल. सासरच्या मंडळींकडून लाभाची शक्यता. मित्रांच्या मदतीने काही लाभ संभवतात.

मकर (Capricorn Horoscope Today ):-

गुंतवणुकी संदर्भात तज्ञांचा सल्ला घ्यावा. प्रलोभनाला भुलून जाऊ नका. दिवसाची सुरुवात उर्जेने होईल. व्यापारी वर्गाला उत्तम दिवस. चर्चेतून मतभेद संपुष्टात येतील.

कुंभ (Aquarius Horoscope Today ):-

काही खर्च अचानक येतील. अति तिखट पदार्थ टाळावेत. आरामाची इच्छा प्रबळ होईल. संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्यावी. अनुभवी व्यक्तींच्या भेटीचा योग.

मीन (Pisces Horoscope Today ):-

स्पर्धेत यश मिळवाल. जोडीदाराचा सल्ला घ्यावा. अचानक धनलाभाची शक्यता. महत्त्वाच्या गोष्टी गुप्त ठेवा. ध्यानधारणेतून मानसिक तणाव कमी होईल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर