Horoscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार ८ ऑगस्ट २०२२

Daily Rashi Bhavishya In Marathi: आजचं राशिभविष्यानुसार मिथुन राशीच्या व्यक्तींनी कामाचा आढावा लक्षात घ्यावा. मानसिक गोंधळ टाळावा.

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार ८ ऑगस्ट २०२२
आजचे राशीभविष्य १८ ऑगस्ट, (Dainik Rashi Bhavishya)

Today Rashi Bhavishya, 08 August 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष (Aries Horoscope Today ):-

वैचारिक गोंधळ राहील. त्यातून कोणतेही मत मांडायला जाऊ नका. खर्च वाढते राहतील.  संकल्पित कामे पूर्णत्वास जातील. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल.

वृषभ (Taurus Horoscope Today ):-

हातातील कामात यश येईल. भावंडांचे सहकार्य लाभेल. वाचनात मन रमवावे. सामाजिक वादात लक्ष घालू नका. मन प्रसन्न राहील.

मिथुन (Gemini Horoscope Today ):-

कामाचा आढावा लक्षात घ्यावा. मानसिक गोंधळ टाळावा. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. वैवाहिक जीवन आनंदी राहील. जोडीदाराचा सल्ला घ्यावा.

कर्क (Cancer Horoscope Today ):-

घरगुती कामे वाढीव राहतील. आळस टाळून कामे करावीत. नवीन प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करावे. कामात यथायोग्य बदल संभवतात. कौटुंबिक खर्च वाढता राहील.

सिंह (Leo Horoscope Today ):-

स्वावलंबी बनावे लागेल. वास्तविकतेचे भान ठेवावे लागेल. पर्यटनाची योजना तूर्तास आखू नये. अतिउत्साह दाखवू नका. निष्काळजीपणा दाखवू नका.

कन्या (Virgo Horoscope Today ):-

मनाची ताकद ओळखा. नेमकी कृती यश देईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. खर्च आवाक्याबाहेर जाऊ देऊ नका. तुमचा हेतू साध्य होईल.

तूळ (Libra Horoscope Today ):-

मनातील शंका काढून टाकावी. घाईने निर्णय घेऊ नयेत. विनाकारण शत्रुत्व पत्करू नका. परोपकाराचे महत्त्व लक्षात येईल. नवीन विचारातून शिकायला मिळेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):-

बोलण्यात तिरकसपणा आणू नका. उगाच विरोधाला विरोध करू नका. मत सौम्यपणे मांडावे. औद्योगिक वाढीसाठी धोरण बदलणे आवश्यक. आर्थिक स्थिती उत्तम राहील.

धनू (Sagittarius Horoscope Today ):-

मनातील भावना व्यक्त कराव्यात. स्वयं निर्णयावर भर द्यावा. मनोरंजनात मन रमवावे. वाहन चालवताना काळजी घ्यावी. वैवाहिक सौख्यात भर पडेल.

मकर (Capricorn Horoscope Today ):-

इतरांवर अवलंबून राहू नका. घरातील वातावरण तप्त राहील. जोडीदाराशी प्रेमळ वार्तालाप कराल. आपल्या उपायांचा चांगला परिमाण जाणवेल. उत्तराला प्रत्युत्तर करू नका.

कुंभ (Aquarius Horoscope Today ):-

भावंडांचे प्रश्न सामोरे येतील. वाढीव मेहनत करावी लागू शकते. आपल्या कामावर विश्वास ठेवावा. वरिष्ठांचे सहकार्य घ्यावे. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

मीन (Pisces Horoscope Today ):-

परस्पर संवादाने कामे होतील. इतरांचे मत जाणून घ्यावे. स्पर्धा जिंकता येईल. करमणुकीत दिवस घालवाल. जोडीदाराचा विश्वास संपादन कराल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
‘या’ ३ राशींना शनिदेवाच्या उलट चालीचा फायदा होईल, जाणून घ्या तुमचाही यात समावेश आहे की नाही
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी