मेष:-

सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. कामाची दगदग वाढेल. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. क्षणिक आनंदाचा लाभ होईल. व्यापारात चांगला लाभ संभवतो.

is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता
1 in every 10 women in the world lives in extreme poverty
प्रत्येकी १० पैकी एका महिलेचं आयुष्य अत्यंत गरिबीत, युएन वुमेनच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर

वृषभ:-

मोठ्या लोकांच्या ओळखीचा लाभ होईल. सर्वांना आनंदाने समजून घ्याल. नवीन मित्र जोडाल. नवीन वाहन घेण्याची इच्छा मनात रूजेल. आर्थिक दर्जा सुधारेल.

मिथुन:-

गैरसमजाला बळी पडू नका. कलागुणांना चांगला वाव मिळेल. मनाजोगी खरेदी करता येईल. तुमच्या कलेचे कौतुक केले जाईल. अति विचार करू नका.

कर्क:-

मनाची विशालता दाखवाल. गायन, वादन कलेला चांगला प्रतिसाद मिळेल. शैक्षणिक कामात यश येईल. मनाची सहृदयता दाखवाल. चांगली कल्पनाशक्ति लाभेल.

सिंह:-

अचानक धनलाभ संभवतो. वारसाहक्काची कामे करता येतील. सासुरवाडीची मदत घेता येईल. काही कामे कमी श्रमात पार पडतील. जोडीदाराची प्राप्ती वाढेल.

कन्या:-

गृहशांती महत्त्वाची आहे. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. पित्तविकार बळावू शकतात. रेस, जुगार यातून लाभ संभवतो. मानसिक शांतता लाभेल.

तूळ:-

जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. साहित्याची आवड जोपासता येईल. घरातील कामात व्यग्र राहाल. घरातील स्वच्छता काढली जाईल. मुलांशी जुळवून घ्यावे लागेल.

वृश्चिक:-

आवाक्याबाहेर खर्च वाढू शकतो. हातातील कामात यश येईल. कौटुंबिक कार्यक्रम काढले जातील. लहान प्रवासाचा आनंद घ्याल. काही कामे खिळून पडतील.

धनू:-

पित्ताचा त्रास जाणवेल. वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. हातातील अधिकार वापरता येतील. रागावर नियंत्रण ठेवावे.

मकर:-

कौटुंबिक खर्चाचा आवाका लक्षात घ्यावा. नातेवाईकांशी मतभेद संभवतात. डोळ्याची वेळोवेळी काळजी घ्यावी. गप्पांच्या ओघात जबाबदारी घेऊ नका. हस्त कलेला उठाव मिळेल.

कुंभ:-

मनातील अनामिक चिंता दूर साराव्यात. वेळेचे योग्य नियोजन करावे. अडथळ्यातून मार्ग काढावा. हजरजबाबीपणे वागाल. कमिशनच्या कामातून लाभ संभवतो.

मीन:-

कागदपत्रे नीट जपून ठेवावीत. फसवणुकीपासून सावध राहावे. जामीनकीच्या व्यवहारात पडू नका. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. व्यावसायिक बदल लक्षात घ्यावेत.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर