Today Rashi Bhavishya, 10 October 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष (Aries Horoscope Today ):-

41 days earn lots off money Due to the tremendous influence of Mars
४१ दिवस नुसता पैसा; मंगळाच्या जबरदस्त प्रभावाने ‘या’ तीन राशी होणार प्रचंड मालामाल
People of this zodiac sign will get a lot of money
१४ जूनपर्यंत होणार भरभराट! सूर्य चमकवणार ‘या’ तीन राशींच्या लोकांचे भाग्य; कमवणार बक्कळ पैसा
xenotransplantation
डुकराची किडनी प्रत्यारोपित केलेल्या पहिल्या व्यक्तीचा मृत्यू; विज्ञानाचा चमत्कार मानले जाणारे झेनोट्रांसप्लांटेशन आहे तरी काय?
budh gochar mercury transit in mesh these 3 zodiac sign get more profit astrology
येत्या २४ तासांनंतर हिऱ्यापेक्षाही चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब; बुधाच्या मेष राशीतील प्रवेशाने संपणार वाईट काळ
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : ५ दिवसानंतर सूर्याचं होणार संक्रमण! ‘या’ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ; मिळेल बक्कळ पैसा
374 Days Later Guru Enters In Shukra Rashi Big Changes Till 2025 The Kundali Of 3 Rashi Can become Billionaire
३७४ दिवसांनी गुरुचे बळ वाढले; २०२५ पर्यंत वृषभ, कन्येसाहित ‘या’ राशींना कोट्याधीश होण्याची संधी, व्हाल धनाचे मालक
Mother in Law Zodiac
Astrology: राशीनुसार जाणून घ्या कसा असेल तुमच्या सासूचा स्वभाव? लग्नानंतर होणार नाही भांडण
From May To August Shani Maharaj Walk With Golden Feet In Kundal
सोनपावलांनी शनी ‘या’ राशींच्या कुंडलीला देणार चमक; मे ते ऑगस्टमध्ये धनाने भरेल झोळी, आयुष्यात बदलाचा संकेत

आपली चिडचिड इतरांना दाखवू नका. संयम बाळगून वागा. नकारात्मक घटना फार मनावर घेऊ नका. कटू गोष्टी अनुकूल करण्याची कला शिकून घ्या. प्रिय व्यक्तीच्या भेटीचा योग.

वृषभ (Taurus Horoscope Today ):-

धार्मिक ग्रंथांचे वाचन होईल. व्यवसायात नीतिचा मार्ग अवलंबा. आजचा दिवस समाधानकारक ठरेल. नवीन ओळखीतून प्रतिष्ठा लाभेल. अप्रिय व्यक्तींची भेट त्रासदायक ठरेल.

मिथुन (Gemini Horoscope Today ):-

मित्र व नातेवाईकांशी सलोख्याने वागा. उगाच वाईटपणा घेऊ नका. मौल्यवान वस्तु जपाव्यात. मुलांकडून शुभ वार्ता मिळेल. जुनी कामे मार्गी लावाल.

कर्क (Cancer Horoscope Today ):-

नवीन कामाकडे लक्ष ठेवा. जे मिळेल ते पदरात पाडून घ्या. सन्मानात वाढ होईल. मुलांच्या जबाबदार्‍या व्यवस्थित पार पाडाल. कुटुंबातील सदस्य चांगली बातमी देतील.

सिंह (Leo Horoscope Today ):-

कौटुंबिक तिढा सोडवायला मदत कराल. मिळकतीचा नवीन स्त्रोत उत्पन्न होईल. एखाद्या कामासाठी अधिक धावपळ करावी लागेल. बोलण्यातून माधुर्य दर्शवाल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल.

कन्या (Virgo Horoscope Today ):-

जुन्या आजारांवर वेळीच लक्ष द्या. कोणतीही गोष्ट पुढे ढकलू नका. धनसंचयात वाढ होईल. व्यापारी क्षेत्रातील व्यक्तींना अपेक्षित यश मिळेल. चांगल्या गोष्टीसाठी खर्च कराल.

तूळ (Libra Horoscope Today ):-

आनंदाची अनुभूति घ्याल. कार्यालयीन वातावरण अनुकूल राहील. एखादा मोठा व्यवहार पार पडेल. घरातील लोकांचा आनंद द्विगुणित होईल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):-

वडिलोपार्जित धनाचा लाभ होईल. कोणत्याही संशयित कामात अडकू नका. पराक्रमात वाढ होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. अधिक धावपळ झाल्याने आराम करण्यावर भर द्यावा.

धनू (Sagittarius Horoscope Today ):-

जुन्या धार्मिक कथांचे श्रवण कराल. मन:शांती लाभेल. विरोधक माघार घेतील. एखाद्या व्यक्तीची भेट संस्मरणीय ठरेल. सासरच्या व्यक्तींकडून लाभ मिळेल.

मकर (Capricorn Horoscope Today ):-

दिवस आनंदात जाईल. जुनी सर्व कामे मार्गी लावाल. आर्थिक व्यवहारात यश येईल. जुने प्रयत्न फलद्रुप होतील. कार्यालयीन सदस्य कौतुक करतील.

कुंभ (Aquarius Horoscope Today ):-

मानसिक गुंतागुंतीत अडकू नका. विचारपूर्वक पाऊले उचला. निराशाजनक घटना दुर्लक्षित कराव्यात. अडचणीतून मार्ग निघेल. शक्यतो कोणत्याही वादात अडकू नका.

मीन (Pisces Horoscope Today ):-

घरात नवीन वस्तूंची खरेदी केली जाईल. जुने परिचित लोक भेटतील. भावंडांना मदतीचा हात पुढे कराल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. प्रवासात सावधगिरी बाळगणे हिताचे ठरेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर