scorecardresearch

Premium

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, मंगळवार ११ ऑक्टोबर २०२२

Daily Rashi Bhavishya In Marathi: आजचं राशिभविष्यानुसार कर्क राशीच्या व्यक्तींनी जोडीदाराशी सामंजस्याने वागा. छोट्या गोष्टीतील मतभेद टाळा.

Astro new
आजचे राशीभविष्य १९ डिसेंंबर , (Dainik Rashi Bhavishya)

Today Rashi Bhavishya, 11 October 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

Daily Horoscope 8 october 2023
Daily Horoscope: जोडीदाराच्या आनंदासाठी खर्च करणार ‘या’ राशीच्या व्यक्ती, जाणून घ्या १२ राशींचे भविष्य
Daily Horoscope 7 october 2023
Daily Horoscope: ‘या’ राशीच्या व्यक्तींना जमिनीच्या कामातून होणार फायदा, पाहा १२ राशींचे भविष्य
Daily Horoscope 27 September 2023
Daily Horoscope: मिथुनला आनंदवार्ता मिळणार तर ‘या’ राशीच्या व्यक्तींना जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभणार, पाहा तुमचे भविष्य
Daily Horoscoper 13 September 2023
Daily Horoscope: ‘या’ राशीच्या व्यक्तींनी जोडीदाराशी वाद करणे टाळावे, पाहा तुमचे भविष्य

मेष (Aries Horoscope Today ):-

जोडीदारामुळे आपला लाभ होईल. महत्त्वाच्या कामात त्यांची मदत घ्या. गरजूंना मदत केल्याचे समाधान मिळेल. दिवस परोपकारात व्यतीत होईल. सकारात्मक राहून केवळ आपल्या कामावर लक्ष केन्द्रित करा.

वृषभ (Taurus Horoscope Today ):-

खर्चावर नियंत्रण ठेवा. अनाठायी खरेदी टाळा. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. मित्रांच्या भेटीचा आनंद घ्याल. प्रलंबित कामे मार्गी लावू शकाल.

मिथुन (Gemini Horoscope Today ):-

जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नये. वडीलांच्या आशीर्वादाने मनातील इच्छा पूर्ण होईल. आपले मनोबल वाढीस लागेल. नोकरीत बदल करू इच्छिणार्‍यांना चांगली संधी मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

कर्क (Cancer Horoscope Today ):-

जोडीदाराशी सामंजस्याने वागा. छोट्या गोष्टीतील मतभेद टाळा. व्यावसायिक योजनांना गती मिळेल. मान, प्रतिष्ठा वाढीस लागेल. वरिष्ठांची मर्जी ओळखून कामे करा.

सिंह (Leo Horoscope Today ):-

स्पर्धेत यश मिळवाल. आत्मविश्वासाला तडा जाऊ देऊ नका. प्रलंबित येणी प्राप्त होतील. व्यवसायिकांना फायदा देणार्‍या संधी समोर यातील. आनंदी दृष्टीकोन बाळगून राहाल.

कन्या (Virgo Horoscope Today ):-

नातेवाईकांच्या ओळखीचा लाभ होईल. आपले विचार लोकांसमोर मांडा. घेतलेले निर्णय लाभ मिळवून देतील. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. उगाचच चिडचिड करू नका.

तूळ (Libra Horoscope Today ):-

लोक तुमच्या कामात ढवळाढवळ करू शकतात. आपले निर्णय स्वत: घ्या. मिळकतीच्या नव्या संधी सामोर्‍या येतील. आपले स्पष्ट मत मांडाल. धावपळ व दगदग वाढेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):-

घरातल्या गोष्टींमध्ये विशेष लक्ष घाला. माहितगार लोकांना आपल्या विचारात सामील करून घ्या. प्रलंबित कामे मार्गी लावाल. बोलताना तारतम्य बाळगा.  मित्राची भेट उपयुक्त ठरेल.

धनू (Sagittarius Horoscope Today ):-

नोकरी, व्यवसायात उत्तम संधी लाभेल. अडकलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. भौतिक सुखाच्या साधनात वाढ होईल. कार्यालयीन सहकार्‍यांशी सलोखा ठेवावा. दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल.

मकर (Capricorn Horoscope Today ):-

मानसिक स्वास्थ्य जपावे. धार्मिक भावना वाढीस लागेल. कमिशन मधून लाभ संभवतो. कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडाल. भावंडांशी मतभेदाची शक्यता.

कुंभ (Aquarius Horoscope Today ):-

व्यावसायिक नव्या जोमाने कामे करतील. दिवसाची सुरुवात धावपळीत होईल. अचानक खर्च उदभवतील. प्रतिकूलतेत संयम बाळगावा. नामस्मरण उपयुक्त ठरेल.

मीन (Pisces Horoscope Today ):-

नोकरीची संधी चालून येईल. उगाच चिडचिड करू नका. छोटे प्रवास लाभदायक ठरतील. दिवस धावपळीत जाईल. औद्योगिक वाढ सुखकारक ठरेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Horoscope today 11 october 2022 daily astrology rashi bhavishya in marathi msr

First published on: 11-10-2022 at 01:10 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×