मेष:-

योग्य मान मिळेल. आपले डोके शांत ठेवावे. आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. कार्यक्षेत्रात नवीन आव्हान सामोरी येऊ शकतात. समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षा पूर्ण कराल.

वृषभ:-

जुनी येणी वसूल होतील. जुन्या ओळखीच्या लोकांच्या भेटी होतील. स्पर्धकांना नामोहरम करायला थोडे अधिक कष्ट पडतील. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास कमी पडू देऊ नका. जोडीदाराच्या भावना समजून घ्याल.

is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
11th April 2024 Panchang Guruvaar Marathi Rashi Bhavishya
११ एप्रिल, गुरुवार पंचांग: आज आयुष्यमान, सौभाग्य योग; तुमच्या राशीच्या कुंडलीत आज कोणत्या रूपात लाभेल गौरी कृपा?
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता
Mangal Budh Yuti
एप्रिलमध्ये ‘या’ राशींना मिळणार प्रचंड पैसा? १८ महिन्यानंतर २ ग्रहांची युती होताच नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

मिथुन:-

घरातील कामे पूर्ण होतील. दिवस धावपळीचा जाईल. मुलांकडून सकारात्मक वार्ता मिळतील. तुमचे मनोबल वृद्धिंगत होईल. कुटुंबासोबत दिवस मजेत जाईल.

कर्क:-

घाईघाईने कामे करावी लागतील. दिवसाचा उत्तरार्ध मजेत जाईल. आध्यात्मिक आवड वाढेल. व्यवसाय विस्ताराच्या विचारावर ठाम राहाल. जोडीदाराच्या यशाने आनंदी व्हाल.

सिंह:-

लोकांची प्रशंसा लाभेल. कामे जलद गतीने उरकावी लागतील. दिवसाची सुरुवात उत्साहाने होईल. सरकारी योजनांचा लाभ मिळवाल. कौटुंबिक खर्चावर आळा घालावा.

कन्या:-

दिवस आनंदात जाईल. घरातील थोरांचे आशीर्वाद घ्या. व्यापारी कौशल्य वापराल. पुढील सोयीसाठी गुंतवणूक कराल. ज्येष्ठांची सेवा करण्याची संधी मिळेल.

तूळ:-

कामाचा व्याप वाढेल. जुनी कामे मार्गी लावाल. संमिश्र घटनांचा दिवस. मनाच्या चंचलतेला आवर घालावी लागेल. विनाकारण धावपळ वाढेल.

वृश्चिक:-

शांत डोक्याने विचार करावा. विचारपूर्वक कामे करावीत. आव्हान स्वीकारताना सावध राहावे. अथक मेहनत यश मिळवून देऊ शकेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.

धनू:-

मनातील इच्छा पूर्ण होईल. दिवसाचा बराच काळ धार्मिक कामात घालवाल. समाजात तुमचा मान वाढेल. धनसंचयात वाढ होईल. मित्रांची मदत फायदेशीर ठरेल.

मकर:-

आपले मत योग्य प्रकारे पट‍वून द्याल. दिवसभर कामाची धावपळ राहील. वडीलधार्‍यांना नाराज करू नका. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. अनावश्यक खर्च टाळावेत.

कुंभ:-

विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. भागीदाराच्या मताचा आदर करावा. तरच यशदायी परिणाम दिसतील. प्रलंबित येणी प्राप्त होतील. कौटुंबिक वादाचे प्रसंग टाळावेत.

मीन:-

अतिविचार करत बसू नका. नवीन ओळखीतून मैत्री वाढेल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत सापडतील. व्यावसायिक गुंतवणूक लाभदायक असेल. जोडीदाराच्या साथीने समोरील प्रश्न सोडवाल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर