मेष:-

मनाची दोलायमान अवस्था जाणवेल. तुमच्यातील ठामपणा दाखवून द्यावा. इतरांवर तुमचा प्रभाव पडेल. अधिकारी व्यक्तींची गाठ पडेल. मैत्रीचे नवीन संबंध जोडले जातील.

prarthana foundation information in marathi
सर्वकार्येषु सर्वदा : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचा, वृद्धांचा निवारा
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Bhagyashree Atram daughter of Minister Dharma Rao Baba Atram to join Sharad Pawar faction
गडचिरोली : धर्मरावबाबा आत्राम कुटुंबातील बंडावर शिक्कामोर्तब; भाग्यश्री आत्राम १२ सप्टेंबरला…
Apte Vachan Mandir passion for innovation Kolhapur news
आपटे वाचन मंदिराला नावीन्यपूर्ण उपक्रमांचा ध्यास
lokrang
पडसाद: तार्किक बुद्धी वापरावी
The Kalyan Court rejected the bail application of Shiv Sena Vaman Mhatre badlapur
बदलापूर: वामन म्हात्रे यांचा जामीन अर्ज फेटाळला
29th August Panchang & Rashi Bhavishya
२९ ऑगस्ट पंचांग: गुरुवारी सिंह, मिथुनसह ‘या’ राशींना होणार लाभ! गुंतवणुकीतून फायदा तर व्यापारासाठी मिळेल नवा भागीदार; वाचा तुमचं राशीभविष्य
nifty crosses 25000 mark
निर्देशांक ऐतिहासिक उच्चांकांपासून अवघा अर्धा टक्का दूर; ‘फेड-कपात’ आशावादाने प्रेरित तेजी सलग आठव्या सत्रात 

वृषभ:-

कौटुंबिक गैरसमज टाळावेत. तुमच्या मनातील आशा पल्लवित होतील. मित्रांची मदत घ्यावी लागेल. काही कामात अनाठायी अडकून पडाल. उगाच चिडचिड करू नका.

मिथुन:-

चंचलतेवर मात करावी. स्त्रियांच्या सानिध्यात वावराल. मनातील इच्छा पूर्ण होतील. कामात घाई करून चालणार नाही. तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल.

कर्क:-

मानसिक चांचल्य जाणवेल. उगाच नसत्या काळज्या करत बसू नका. वाताचे त्रास संभवतात. अनाठायी चिडचिड वाढू शकते. फार हट्टीपणा करू नका.

सिंह:-

व्यावसायिक लाभावर लक्ष केंद्रित करावे. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. मनाची विशालता दाखवाल. अंगीभूत कलेला चांगला वाव मिळेल.

कन्या:-

अतिविचार करणे टाळावे लागेल. बौद्धिक थकवा जाणवेल. उगाचच नसत्या गोष्टीत लक्ष घालू नका. कौटुंबिक प्रश्न जाणून घ्यावेत. एकाचवेळी अनेक कामे अंगावर घ्याल.

तूळ:-

पत्नीच्या प्रेमळ स्वभावाचा प्रत्यय येईल. मुलांशी लहान-सहान गोष्टीवरून कुरबुर होऊ शकते. खर्चाचे भान ठेवावे लागेल. नसते साहस करतांना सारासार विचार करावा.

वृश्चिक:-

गोष्टींची आवश्यकता लक्षात घेऊन खर्च करावा. वादावादीत सहभाग नोंदवू नका. मागचा-पुढचा नीट विचार करावा. उतावीळपणे वागू नका. आपली आर्थिक कुवत लक्षात घ्यावी.

धनू:-

तुमचा कामातील जोम वाढेल. आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करावा. आपलेच म्हणणे खरे कराल. विचारांना वेगळी दिशा देऊन पहावी. चटकन रागवू नका.

मकर:-

शांत व गंभीर विचार मांडाल. कामे खिळून पडल्यासारखी वाटतील. सामुदायिक गोष्टीत लक्ष घालू नका. वादाचा मुद्दा टाळावा. संसर्गजन्य विकार जडू शकतात.

कुंभ:-

सतत खटपट करत राहाल. मनात प्रबळ इच्छा जागृत होईल. मुलांच्या कारवायांवर लक्ष ठेवा. सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. सांपत्तिक दर्जा टिकवून ठेवावा लागेल.

मीन:-

कामातील बदलांकडे सकारात्मकतेने पहावे. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. तडफदारपणे वागणे ठेवाल. कामे जलद गतीने उरकाल. महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर