मेष:-

चांगुलपणाने लोकांना आपलेसे कराल. स्वभावातून परोपकारी भावना व्यक्त कराल. कामातील बदल हिताचा ठरेल. केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल.

Gold Hits All Time High, 2400.35 doller an Ounce, global market gold price, global market gold high, all time gold high in world, Global Economic Uncertainty , gold,finance news, finance article, marathi news, vietnam, america,
सोन्याची विक्रमी तेजीची दौड कायम, जागतिक बाजारात प्रति औंस २,४००.३५ डॉलरचा उच्चांक
The price of gold reached the highest level
विश्लेषण: सोन्याला तेजीची झळाळी का?
17 Days Later Surya Nakshatra Gochar In Revati These Three Rashi To Earn Money
येत्या १७ दिवसात ‘या’ ३ राशींच्या कुंडलीत सूर्याची किरणं दाखवतील श्रीमंतीचा मार्ग; गुढीपाडव्यानंतर बदलणार नशीब
Shukra Transit: 31 March Malavya Rajyog In Meen Rashi
३१ मार्चपासून मालव्य राजयोग बनल्याने ‘या’ राही कमावतील प्रेम, पैसे व प्रतिष्ठा; धनलक्ष्मीच्या आवडत्या राशी कोणत्या पाहा?

वृषभ:-

आपली मानसिकता जपावी. आजचा दिवस शुभ असेल. कुटुंबासोबत संस्मरणीय वेळ घालवाल. दुपार नंतर चांगली बातमी मिळेल. पाहुणे मंडळी भेटतील.

मिथुन:-

आपल्या मनोकामना पूर्ण होतील. वडीलधार्‍या मंडळींचे शुभाशिर्वाद मिळतील. मात्र दिवस काहीसा व्यस्त राहील. नवीन योजना आमलात आणण्याचा प्रयत्न करावा. मन प्रसन्न राहील.

कर्क:-

घरातील वातावरण चांगले राहील. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. कोष वृद्धीचे संकेत. व्यावसायिक योजनांना गती मिळेल. भावनिक निर्णय टाळा.

सिंह:-

आपल्या बोलण्याने लोकांचे समाधान होईल. एखादी महत्त्वाची इच्छा पूर्ण होऊ शकेल. मुलांच्या जबाबदार्‍या पार पाडाल. अपचनाचे त्रास संभवतात. आरोग्याची काळजी घ्यावी.

कन्या:-

घरात मोठ्या वस्तूंची खरेदी कराल. कामाचा व्याप वाढता राहील. कौटुंबिक वातावरण सुखकर असेल. आपल्या कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. कामाचा खोळंबा होणार नाही याची काळजी घ्या.

तूळ:-

समाधानकारक आनंदी वार्ता समजतील. उत्तमोत्तम संधी मिळू शकतील. शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस. मिळकतीचे नवीन स्त्रोत सापडतील. मोसमी आजार त्रस्त करू शकतात.

वृश्चिक:-

अडून राहिलेली कामे पूर्ण होतील. आपल्या मनाप्रमाणे काम पूर्ण करता येईल. बोलताना तारतम्य बाळगवे. विनाकारण डोकेदुखी वाढू शकते. रागावर नियंत्रण ठेवावे.

धनू:-

मानसिक समाधान लाभेल. आजचा दिवस खास असेल. भौतिक सुखात वाढ होईल.  नोकरदार वर्गाला दिलासा मिळेल. काही क्षुल्लक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

मकर:-

धार्मिक कामासाठी पैसे खर्च कराल. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस. मन प्रसन्न राहील. कौटुंबिक जबाबदार्‍या उत्तमरीत्या पार पाडाल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

कुंभ:-

दिवस मजेत घालवाल. मिळकत आणि खर्च यांची सांगड घालावी. झेपेल इतकेच काम अंगावर घ्यावे. खरेदी-विक्रीच्या व्यवहारात चोख राहावे. मानसिक प्रसन्नता जपावी.

मीन:-

मनातील दूषित गोष्टींना हद्दपार करा. आपल्याच मतावर अडून राहू नका. छोटे प्रवास संभवतात. व्यवसाय वाढीमुळे समाधान लाभेल. वैवाहिक जीवन सुखमय होईल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर