मेष:-

मान्य नसलेल्या गोष्टीला सहमती दर्शवू नका. संमिश्र घटनांचा दिवस. लाभाच्या काही संधी प्राप्त होतील. गुंतवणूक लाभदायक ठरेल. धार्मिक गोष्टीत मन रमेल.

Kapil Dev Says Some people will suffer but no one is bigger than the country
Kapil Dev : “काही लोकांना त्रास होईल, परंतु देशापेक्षा कोणीही…”, कपिल देव यांनी बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयाचे केले स्वागत
Buldhana, Minor Girl, sexually Tortured, Case Registered, female friend,
बुलढाणा : अल्पवयीन मुलीला डांबून दहा दिवस अत्याचार; मैत्रिणीनेच दिला दगा….
success story of ias saumya sharma
परीक्षेच्या दिवशीच बिघडली तब्येत, तरीही मानली नाही हार, वाचा IAS सौम्या शर्माचा प्रेरणादायी प्रवास
santhan rajiv gandhi case convict
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता?

वृषभ:-

भागीदारीत काळजीपूर्वक पैसा गुंतवा. अतिघाई टाळा. इतरांचे म्हणणे ऐकून घ्या. चटकन निर्णयावर येऊ नका. मानसिक शांतता जपावी.

मिथुन:-

स्वत:वर खर्च करा. पराक्रम योग्य ठिकाणी दाखवा. नफा-तोट्याकडे लक्ष ठेवा. हितशत्रूंचा त्रास संभवतो. कामातील बदलांना सामोरे जा.

कर्क:-

अती लोभ टाळावा. आपली जोखीम ओळखून कामे करा. दिलासादायक दिवस जाईल. कुटुंबातील सदस्य समजून घेतील. कामातून मनासारखे समाधान मिळेल.

सिंह:-

व्यावसायिक संधीकडे लक्ष ठेवा. हातातील अधिकार वापरता येतील. नवीन अनुभव गाठीशी बाळगाल. आवडीच्या वस्तु खरेदी कराल. आनंद वार्ता मिळू शकतील.

कन्या:-

योग्य सल्ल्याने लोकांचे समाधान कराल. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. जवळचे नातेवाईक भेटतील. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. जुन्या गोष्टी विसरून पुढे जा.

तूळ:-

नवीन संधीने खुश व्हाल. थोडी तडजोड करावी लागेल. अती श्रमामुळे थकवा जाणवू शकतो. कौटुंबिक गैरसमज दूर करावेत. ज्येष्ठ मंडळींची गाठ पडेल.

वृश्चिक:-

प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. मुलांची स्वतंत्र मते समजून घ्या. क्षुल्लक कारणांवरून चिडू नका. केवळ कामावर लक्ष केंद्रित कराल. वादाचे प्रसंग टाळा.

धनू:-

दिवस मनासारखा घालवाल. मनाला चांगल्या विचारात गुंतवून ठेवा. कौटुंबिक समस्या प्राधान्याने सोडवाव्यात. समाधानकारक घटना घडतील. जोडीदाराशी मतभेद संभवतात.

मकर:-

तुमच्या शांत स्वभावाचा लोक गैरफायदा घेऊ शकतात. मानसिक स्वास्थ्य हरवू नका. समोरील प्रश्न शांतपणे सोडवावेत. उत्साहाने दिवसभर कार्यरत रहा. धार्मिक ग्रंथांचे वाचन चालू ठेवा.

कुंभ:-

चटकन धाडसी निर्णय घेऊ नका. मनातील इच्छा पूर्ण होईल. गुरुजनांचा सल्ला विचारात घ्या. वेळेचा सदुपयोग करावा. लाभाची संधी सोडू नका.

मीन:-

व्यावसायिक ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. केलेल्या कामाचे समाधान मिळेल. तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल. अडकलेले पैसे प्राप्त होऊ शकतील. शक्तीच्या जोरावर समस्या सोडवू शकाल. 

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर