Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार १३ ऑगस्ट २०२२

Daily Rashi Bhavishya In Marathi: आजचं राशिभविष्यानुसार वृश्चिक प्रतिष्ठित लोकांशी ओळख वाढेल. कामाला नवीन चालना मिळेल.

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार १३ ऑगस्ट २०२२
आजचे राशीभविष्य १८ ऑगस्ट, (Dainik Rashi Bhavishya)

Today Rashi Bhavishya, 13 August 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष (Aries Horoscope Today ):-

मानसिक दडपण कमी होईल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. काही तडजोडी कराव्या लागतील. भौतिक सुखाला फार महत्त्व राहणार नाही. मान-सन्मानात वाढ होईल.

वृषभ (Taurus Horoscope Today ):-

जुनी कामे पूर्ण कराल. कौटुंबिक खर्चाला आवर घालावी लागेल. मानसिक स्थैर्य लाभेल. बदलाच्या योजना अनुकूल ठरतील. कौटुंबिक गैरसमज मनातून काढून टाकावेत.

मिथुन (Gemini Horoscope Today ):-

समोरील प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल. योजनाबद्ध कामे करावीत. घरातील प्रलंबित कामे उरकाल. मनाचा गोंधळ उडवून घेऊ नका. वरिष्ठांच्या होकारत होकार मिसळावा लागेल.

कर्क (Cancer Horoscope Today ):-

जवळच्या व्यक्ति भेटतील. जवळच फेरफटका मारायला जाता येईल. जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे. भावंडांकडून चांगल्या बातम्या मिळतील. सहकारी तुम्हाला चांगली मदत करतील.

सिंह (Leo Horoscope Today ):-

मनातील वाईट गोष्टींचा निचरा करा. सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. सामाजिक प्रतिष्ठा जपावी. आवडी बाबत दक्ष राहाल. धाडस व पराक्रमात वाढ होईल.

कन्या (Virgo Horoscope Today ):-

इतर कोणाकडून मदतीची फार अपेक्षा करू नका. मानसिक अवस्था संतुलित ठेवा. आवडत्या कामांमध्ये वेळ घालवा. मानापमानाच्या प्रसंगांकडे दुर्लक्ष करावे. कले संदर्भात नवीन वाट चोखाळाल.

तूळ (Libra Horoscope Today ):-

पूर्वी केलेली बचत मोलाची ठरेल. अधिकारी वर्ग तुमच्यावर खुश राहील. विशाल दृष्टीकोन बाळगावा. मित्रांशी सलोख्याने वागावे. मनाची चंचलता जाणवेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):-

प्रतिष्ठित लोकांशी ओळख वाढेल. कामाला नवीन चालना मिळेल. अति उत्साह दाखवायला जाऊ नका. मानसिक शांतता लाभेल. आर्थिक आघाडीवर दिवस चांगला जाईल.

धनू (Sagittarius Horoscope Today ):-

नवीन संधीकडे लक्ष ठेवावे. कामात चिकाटी ठेवावी लागेल. एखादी नवीन गोष्ट हाती लागू शकते. कुटुंबातील सदस्यांशी सलोखा ठेवावा. कौटुंबिक काळजी सतावत राहील.

मकर (Capricorn Horoscope Today ):-

मनातील संभ्रम काढून टाकावेत. स्थावर विषयक कामे निघतील. हाताखालील लोक चांगले मिळतील. सहकारी वर्गाकडून मदतीची अपेक्षा बाळगू नका. एकावेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका.

कुंभ (Aquarius Horoscope Today ):-

कामे योग्य पद्धतीने मार्गी लागतील. कामातून समाधान लाभेल. तुमचा उत्साह वाढीस लागेल. वाहन चालवताना सावधानता बाळगावी. मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवा.

मीन (Pisces Horoscope Today ):-

शांत राहून परिस्थितीचा आढावा घ्यावा. कुटुंबियांसोबत वेळ घालवावा, त्यातून मानसिक समाधान लाभेल. भागीदारीच्या कामातून चांगला लाभ होईल. बुद्धी चातुर्यावर कामे पार पाडाल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Shri Krishna Janmashtami 2022: जन्माष्टमीला ‘या’ वस्तूंची खरेदी ठरते दुहेरी लाभ; आजच तपासून घ्या
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी