scorecardresearch

Premium

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार १४ ऑक्टोबर २०२२

Daily Rashi Bhavishya In Marathi: आजचं राशिभविष्यानुसार कन्या राशीच्या व्यक्तींनी आळसात दिवस घालवू नका. नातेवाईक भेटतील.

Astro new
आजचे राशीभविष्य १९ डिसेंंबर , (Dainik Rashi Bhavishya)

Today Rashi Bhavishya, 14 October 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष (Aries Horoscope Today ):-

March month Astrology
March Astrology : मार्च महिन्यात ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल, कुटूंबात नांदेल सुख समृद्धी
12 February Panchang Tilkund Chaturthi Shubh Muhurta Mesh To Meen 12 Rashi Bhavishya Who Will Get Ganpati Blessing Money Astrology
१२ फेब्रुवारी पंचांग: तिलकुंद चतुर्थी प्रारंभ होताच ‘या’ राशींचे नशीब उजळणार; १२ राशींना बाप्पा कसा देतील आशीर्वाद?
8th February Panchang Marathi Horoscope Shravan Nakshatra Siddhi Yog Guru krupa For These Zodiac Signs Mesh To Meen
८ फेब्रुवारी पंचांग: आज श्रावण नक्षत्रात ‘या’ राशींना लाभेल गुरुकृपा; सिद्धी योग बनल्याने कुणाला लाभेल ‘अच्छा दिन’
4th February Panchang Marathi Sunday Suryadev Krupa Mesh To Meen Rashi Bhavishya Love Life Money Health Partners Astrology
४ फेब्रुवारी पंचांग: रविवारी ‘या’ राशींचे नशीब सूर्यासारखे चमकणार; तन- मन- धनाबाबत तुमच्या कुंडलीत काय आहेत संकेत?

मानसिक विकासासाठी बळ एकजूट करा. मनातील संमिश्र विचार काढून टाका. अधिकारी वर्गाशी मतभेद संभवतात. कौटुंबिक सदस्यांची साथ मिळेल. दिवसभर कामाची गडबड राहील.

वृषभ (Taurus Horoscope Today ):-

घरातील कामासाठी पैसे खर्च होतील. दिवस आव्हानात्मक असेल. कोणावरही चटकन विश्वास ठेऊ नका. महागड्या वस्तू सांभाळून ठेवा. सावधगिरीने परिस्थिती हाताळा.

मिथुन (Gemini Horoscope Today ):-

कुटुंबात मान वाढेल. तुमच्या कल्पकतेचे कौतुक केले जाईल. प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करा. निश्चयाने कामे तडीस न्यावीत. मोसमी आजार त्रस्त करू शकतात.

कर्क (Cancer Horoscope Today ):-

आजारांकडे दुर्लक्ष करू नका. लहान गोष्टी सुद्धा अंगावर काढू नका. कोणतीही जोखीम पत्करताना सावध रहा. आर्थिक व्यवहारासंबंधी निर्णय विचारपूर्वक घ्या. जोडीदाराशी विचार विनिमय करा.

सिंह (Leo Horoscope Today ):-

दिवस चांगला जाईल. मेहनतीचे चीज होईल. उदार मनाने क्षमाशील राहाल. जोडीदाराची मदत घ्याल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल.

कन्या (Virgo Horoscope Today ):-

आळसात दिवस घालवू नका. नातेवाईक भेटतील. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करणे हिताचे ठरेल. जोडीदाराशी जुळवून घ्यावे.

तूळ (Libra Horoscope Today ):-

आपले मत सर्वांसमोर मांडाल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नवीन योजनेवर काम कराल. घरातील जबाबदारी अंगावर पडेल. आवडीसाठी खर्च कराल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):-

नातेवाईकांशी जुळवून घ्या. भावनात्मक प्रसंग घडू शकतात. विचारपूर्वक निर्णय घ्या. गोड बोलून कामे करून घ्या. नवीन ओळख होईल.

धनू (Sagittarius Horoscope Today ):-

आपले स्वतंत्र व्यक्तिमत्व दाखवून द्या. त्यातून लाभच होईल. नातेवाईक आनंदवार्ता देतील. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. सकारात्मकता वाढीस लागेल.

मकर (Capricorn Horoscope Today ):-

भावंडांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. दिवस मर्जीप्रमाणे घालवाल. मनातील नकारात्मकता काढून टाका. धार्मिक गोष्टीत सहभागी व्हा. कमिशनचा लाभ मिळेल.

कुंभ (Aquarius Horoscope Today ):-

मनातील निराशा झटकून टाका. ध्यानधारणेत मन रमवा. तणावाखाली नवीन गोष्ट करू नका. कुटुंबातील सदस्यांची साथ मिळेल. बोलताना शब्दांचे महत्त्व लक्षात घ्या.

मीन (Pisces Horoscope Today ):-

नवीन संधी चालून येतील. योग्य वेळी पाऊले उचला. परंतु सारासार विचारांची जोड घ्या. क्षुल्लक वादापासून दूर रहा. दूरच्या मित्रांशी संपर्क साधाल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Horoscope today 14 october 2022 daily astrology rashi bhavishya in marathi msr

First published on: 14-10-2022 at 01:10 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×