Today Rashi Bhavishya, 15 August 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य. मेष (Aries Horoscope Today ):- किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नये. रागावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. हातातील कलेला वेळ द्याल. जवळच्या ठिकाणी फिरायला जाल. वृषभ (Taurus Horoscope Today ):- उधारीचे व्यवहार नकोत. मुलांच्या सहवासातून आनंद मिळेल. दिनक्रम व्यस्त राहील. अधिकार्यांच्या रोषाला बळी पडू नका. नवीन योजनांवर काम कराल. मिथुन (Gemini Horoscope Today ):- करमणुकीत वेळ घालवाल. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. कष्टाला पर्याय नाही. समोरील गोष्टीचा आनंद घ्याल. नोकरदार वर्गाच्या समस्यांचे निराकरण होईल. कर्क (Cancer Horoscope Today ):- महत्त्वाचे निर्णय घेताना अडचण येऊ शकते. ध्यानधारणा करावी. दिवसभर आत्ममग्न राहाल. केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा. सामाजिक हितसंबंध सुधारतील. सिंह (Leo Horoscope Today ):- शब्द देताना शहानिशा करा. हितशत्रूंचा त्रास संभवतो. अनावश्यक चिंता करत बसू नका. जबाबदार्या वाढतील. आपल्या भावना उत्कृष्ट पद्धतीने मांडाल. कन्या (Virgo Horoscope Today ):- पती पत्नीमध्ये गैरसमजाचे वारे वाहू शकतात. वेळेचे महत्त्व ध्यानात घ्या. परिस्थितीनुरूप बदलावे लागेल. कौटुंबिक वातावरण खेळते राहील. दिवसाच्या पूर्वार्धात चांगली कामे करावीत. तूळ (Libra Horoscope Today ):- अडचणीवर खंबीरपणे मात कराल. दिवस मनाजोगा घालवाल. जोडीदाराची बाजू वरचढ ठरू शकते. अति उत्साह दाखवायला जाऊ नका. नातेवाईकांचे प्रश्न सोडवावे लागतील. वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):- मानसिक चंचलता जाणवेल. नसती काळजी करू नका. पराक्रमाला वाव आहे. हातातील कामात यश येईल. विरोधकांचा त्रास कमी होईल. धनू (Sagittarius Horoscope Today ):- प्रसंग ओळखून सामाजिक कार्य करा. मुलांचे वागणे स्वतंत्र वृत्तीचे वाटेल. अंगमेहनतीची कामे कराल. दैनंदिन कामात चाल ढकल करू नका. जोडीदार तुमची इच्छा पूर्ण करेल. मकर (Capricorn Horoscope Today ):- उगाच रागराग करू नका. वाणीवर ताबा ठेवणे हिताचे ठरेल. वरिष्ठांना नाराज करून चालणार नाही. कौटुंबिक अडचणीतून मार्ग काढाल. कामाचा उरक वाढेल. कुंभ (Aquarius Horoscope Today ):- खेळीमेळीतून सत्कार्य कराल. कामाचा जोम वाढेल. समोरील संधी ओळखायला शिका. जोडीदाराच्या प्राप्तीत वाढ होईल. व्यवहारकुशलता दाखवावी. मीन (Pisces Horoscope Today ):- अचानक धनलाभाचा योग. कौटुंबिक वातावरण स्थिर ठेवावे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. प्रकृतीत सुधारणा होईल. पथ्यपाणी चुकवू नये. – ज्योतिषी विद्याधर करंदीकर